Horoscope Today 5 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 5 ऑगस्ट 2025, आजचा वार मंगळवार आहे. आज पुत्रदा एकादशी आहे, हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विष्णू आणि गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज तुमच्या स्वभावामध्ये छक्के पंजे नसले तरी कोणत्याही अडचणीतून सुटका करून घेण्यासाठी वैध अवैध मार्गाचा अवलंब कराल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन त्याप्रमाणे वागणूक ठेवावी, एखाद्या वेळी नोकरीमध्ये अधिकाराचा गैरवापर करण्याचा मोह होईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज मुलांना चार उपदेशाचे शब्द सांगावेसे वाटतील, कधीकधी निराश होण्याचे प्रसंग येतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो समस्यांचा योग्य क्रम लावल्यास त्यावर मात करता येईल, इथे चिंतकांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे तुम्हाला उत्साह येईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज घरातील समारंभाच्या निमित्ताने आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील, परंतु आपले प्रकृती मान सांभाळून राहावे
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज महिलांना मनाप्रमाणे कामे करून घेण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज स्वतःच्या मस्त धुंदीत दिवस घालवणार आहात, नोकरीमध्ये सुद्धा वरिष्ठांची हांजी हांजी न करता मनाप्रमाणे वागाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज नोकरी बदलण्याचा संधी चालून येतील, व्यवसाय नोकरीत आजूबाजूचे वातावरण तुम्हाला हवे तसे मिळेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज उत्साही आणि आनंदी वातावरणात कामाचा आनंद घ्याल, आर्थिक बाजू भक्कम होईल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो खूप दिवस अडकून पडलेले पैसे हातात येतील, महिला घरामध्ये माझे तेच खरे हा पवित्रा घेतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज आपल्या हक्काच्या वस्तूंबाबत तुमचे विचार स्पष्ट आणि स्वच्छ राहतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसाय सरकारी अडलेली कामे पार पडतील, महत्त्वाच्या कागदपत्रांवर शिक्कामोर्तब करून घ्यावे.
हेही वाचा :
Putrada Ekadashi 2025: 5 ऑगस्टच्या पुत्रदा एकादशीला 'या' 4 राशींचं भाग्य सुस्साट! 1 नाही, 2 शुभ योग बनतायत, संततीसह संपत्तीचंही सुख, भगवान विष्णूंची कृपा!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
