Astrology : आज, सोमवार, 4 मार्च रोजी वृश्चिक राशीतून चंद्र धनु राशीत जाणार आहे. तसेच आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी सिद्धी योग, रुचिक योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आजच्या शुभ योगांचा विशेष लाभ मिळणार आहे. या राशीचे लोक चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च करतील आणि सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतील. या 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांचं एक महत्त्वाचं प्रलंबित काम शंकराच्या कृपेने अचानक पूर्ण होऊ शकतं, ज्याची तुम्हाला अपेक्षाही नसेल. जर तुम्ही शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी व्यतिरिक्त नोकरदार लोक पार्ट टाईम जॉब देखील सुरू करू शकतात, ज्यामुळे साईड इनकम मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल, तुम्हाला प्रत्येक परीक्षेत यश मिळेल. कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं तर, कुटुंबात शांती आणि आनंद राहील आणि तुमच्या आईच्या मदतीने तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. तुमच्या जोडीदारासोबत काही वाद सुरू असतील तर ते आज संपतील.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज पूर्ण दिवस उत्साही वाटतील. सकाळपासून जोमानं काम कराल. महादेवाच्या कृपेने तुम्हाला पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग सापडतील. तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल आणि धर्मादाय कार्यात काही पैसे खर्चही होऊ शकतात. नोकरदार लोक आज ऑफिसमध्ये त्यांच्या कामावर समाधानी राहतील आणि बॉसकडून तुमच्या कामाची प्रशंसा देखील होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. वृश्चिक राशीचे लोक आज प्रभावशाली लोकांच्या संपर्कात येतील, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला चांगले फायदे मिळतील. समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर आज तुमचं आरोग्य सुधारेल. लव्ह लाईफमध्ये असलेले लोक आज आपल्या जोडीदारासोबत भविष्यातील योजना बनवतील.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. धनु राशीचे लोक कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतील आणि. काम आणि वैयक्तिक जीवनात चांगला ताळमेळ राहील. करिअरमध्ये आज नवीन प्रगतीचे मार्ग मिळतील. तुम्ही काही लक्झरी वस्तूंच्या खरेदीवर खूप पैसा खर्च कराल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही भेटवस्तू खरेदी कराल. आज तुम्ही तुमच्या प्रियकराच्या प्रेमात बुडालेले दिसाल आणि त्यांच्यासोबत रोमँटिक वेळ घालवाल.
कुंभ रास (Aquarius)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनातील अडथळे आज महादेवाच्या कृपेने दूर होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची प्रत्येक पावलावर पूर्ण साथ मिळेल. तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी तुम्हाला ताबडतोब माफी मागावी लागेल. कोणत्याही नवीन योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी तुम्ही तुमच्या भावांशी बोलणं आवश्यक आहे, ज्यांच्याकडून तुम्हाला चांगला सल्ला मिळेल. जर तुम्ही आधी कर्ज घेतलं असेल तर आज तुम्ही त्याची परतफेड करू शकाल. नोकरदार लोक आणि व्यापारी कामाच्या ठिकाणी त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या योग्यपणे पार पाडू शकतील आणि त्यांना नफाही मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: