Horoscope Today 4 April 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 4 एप्रिल 2026, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आजचा दिवस सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कामे करून घेण्यासाठी पैशाचा अपव्यय संभवतो, परंतु त्यासाठी सभोवतालच्या व्यक्तींचे सहकार्य मात्र उत्तम मिळेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस स्वतःच्या नादात राहिल्यामुळे समोरच्या माणसांच्या सांगण्याकडे पुष्कळदा दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे गैरसमज होतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस कामाचा वेग प्रचंड वाढेल, पूर्वीची ध्येयधोरणे ठरवली असती त्याकडे पोहोचण्याचा मार्ग दिसेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीसाठी आजचा दिवस परिस्थितीवर मात कशी करायची हे तुम्हाला सांगावे लागणार नाही, यशाला खेचून आणण्याची ताकद तुमच्यात येईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीसाठी आजचा दिवस विद्यार्थ्यांनी नव्या उमेदीने कामाला लागावे, व्यवहाराशी तुमची थोडीफारकतच झालेली दिसेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीसाठी आजचा दिवस कल्पनाशक्तीच्या भराऱ्या जरा जास्तच माराल, नोकरी व्यवसायात बौद्धिक भाग जरा जास्त वापरला तर कामे मार्गी लागतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीसाठी आजचा दिवस दानधर्म तीर्थयात्रेचे बेत आखाल, अध्यात्मिक जीवनाची आवड निर्माण होईल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कोर्ट कचेरीच्या निर्णयात अचानक बदल होण्याच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल, सामाजिक संस्थेतील कार्य परोपकार यावर भर द्याल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीसाठी आज सरकारी अडलेली कामे मार्गी लागतील, आर्थिक लाभ झाला तरी अचानक पैसा खर्च होण्याची शक्यता आहे
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीसाठी आजचा दिवस महिलांनी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा, दुसऱ्यावर चटकन विसंबून राहण्याच्या तुमच्या स्वभावाला मर्यादा घालायला हवी
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस कला, चित्रपट, साहित्य क्षेत्रात नाम कमवू शकाल, आर्थिक स्थिती सुधारेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मकर राशीसाठी आजचा दिवस गोड बोलण्यामुळे बरीच कामे इतरांकडून करून घ्याल, पूर्वीपासून जे लाभ मिळायचे राहिले असतील ते मिळतील.
हेही वाचा
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! 6 पैकी 4 राशींचा भाग्योदय निश्चित, कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
