Horoscope Today 31 March 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 31 मार्च 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आजचा दिवस घरामध्ये एखाद्या महागड्या वस्तूची खरेदी कराल, महिला घरातील वातावरणात रमून जातील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस कुठेतरी विश्वास ठेवून आपले दुःख हलके करायला लागणार आहे, यासाठी मोठी भावंडे आणि जवळच्या मित्रांचा खूप उपयोग होईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस तुमच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी तुमच्या जवळचे लोक तत्पर राहतील, शिवाय त्यांच्याकडून सहकार्य मिळेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीसाठी आजचा दिवस तुमच्या भाग्यामध्ये जे आहे ते कोणीच काढून घेऊ शकणार नाही, आज तुम्हाला मिळणाऱ्या लाभामध्ये फारसे कष्ट करावे लागणार नाहीत
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीसाठी आजचा दिवस घरातील ज्येष्ठ व्यक्तींची मते न पटल्यामुळे घरामध्ये थोडे वाद संभवतात, महिलांनी अशावेळी सामोपचाराचे धोरण स्वीकारावे
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीसाठी आजचा दिवस खूप दिवसांपासून दडून राहिलेल्या भावनांचा अविष्कार दाखवायची संधी आज तुम्हाला मिळणार आहे, जवळच्या माणसाजवळ मन मोकळं केल्यामुळे हलकं वाटेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीसाठी आजचा दिवस प्रेमीजन आपल्या कोमल नाजूक भावना योग्य व्यक्तींसमोर व्यक्त करतील, खूप स्वप्नही रंगवतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संगीत गायन वादन या कलांमध्ये प्राविण्य मिळेल, श्रद्धेची भक्ति बरोबर झालेली मैत्री उपासकांना समाधान घेऊन जाईल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीसाठी आज घरामध्ये जरा जास्त लक्ष देऊन आपली कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडाल, त्यासाठी शक्य तितका त्यागही कराल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीसाठी आजचा दिवस स्वतःबरोबर इतरांचाही विचार कराल, आर्थिक उत्कर्ष संथपणे झाला तरी दीर्घकाळ त्याची फळे मिळत राहतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस दुसऱ्यावर टीका करायचे टाळा, महिला थोड्या हट्टी बनतील, नोकरीत बदल करण्याची इच्छा असणाऱ्यांनी तसा निर्णय घ्यायला हरकत नाही.
हेही वाचा
2026 Horoscope: मार्च संपतोय, 2026 चे पुढचे 9 महिने चांगले की वाईट? 6 राशींना मोठ्ठे सरप्राईझ.. खुशखबर अन् पैसा! 12 राशींचे राशीभविष्य..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीसाठी आजचा दिवस इतरांशी स्पर्धा करण्याचे आव्हान पेलाल आणि इतरांच्या कौतुकास पात्र ठराल
