Horoscope Today 31 January 2025 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 31 January 2025 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 31 January 2025 : आज 31 जानेवारीचा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस आहे. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. तसेच, आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Today Horoscope)
मेष राशीचे लोक आज व्यावसायिक योजनांवर पूर्ण लक्ष देतील. तुमची आर्थिक पूर्वीपेक्षा चांगली राहील. आज तुम्ही खूप तणावात दिसाल. विद्यार्थी शिष्यवृत्तीशी संबंधित कोणत्याही परीक्षेची तयारी करू शकतात. नवीन घर वगैरे घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होईल. प्रॉपर्टी डील करणाऱ्या लोकांसाठी मोठी डील फायनल होऊ शकते. तुमच्या कुटुंबात काही शुभ कार्यक्रमाची तयारी सुरू होऊ शकते.
वृषभ रास (Taurus Today Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांच्या घरी आज प्रसन्न वातावरण राहील. नोकरीत तुमच्यावर थोडा कामाचा दबाव अधिक असेल. कोणत्याही गोष्टीबाबत बेफिकीर राहू नये. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सौख्य राहील. तुम्हाला एखाद्या जुन्या चुकीबद्दल पश्चाताप होईल. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल, प्रत्येक कामाचं चांगलं फळ आज तुम्हाला मिळेल. एखाद्या कामाच्या संदर्भात घरातील वरिष्ठ तुम्हाला काही सल्ला देतील, तुम्ही तो ऐकला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे.
मिथुन रास (Gemini Today Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. तुम्ही कोणत्याही व्यावसायिक करारावर स्वाक्षरी करू शकता. आज तुम्ही काही कठोर निर्णय घेऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या तब्येतीची काळजी वाटत असेल तर त्यातही तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही तुमच्या घराच्या नूतनीकरणावरही चांगला पैसा खर्च कराल. एखाद्याच्या बोलण्यामुळे तुम्ही रागवू शकता आणि अनावश्यक भांडणात पडू शकता, ज्यावर तुम्हाला थोडं लक्ष देणं आवश्यक आहे.
कर्क रास (Cancer Today Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला कोणत्याही विषयावर अनावश्यक वाद टाळावे लागतील. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला संयम राखावा लागेल. तुम्ही प्रवासाला जात असाल तर वाहन जपून चालवा, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. कुटुंबात भांडणं वाढतील, ज्यामुळे तुमचा तणाव वाढेल.
सिंह रास (Leo Today Horoscope)
सिंह राशीच्या लोकांची नेतृत्व क्षमता आज वाढेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं लागेल आणि तुमच्या काही इच्छा आज पूर्ण होऊ शकतात. जर तुम्ही नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्यासाठी इतर ठिकाणी अर्ज करू शकता. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग आज मोकळा होईल. तुमच्यावर काही कर्ज असेल तर ते तुम्ही मोठ्या प्रमाणात फेडू शकता.
कन्या रास (Virgo Today Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. आज तुमच्या कामाचा ताण असेल. जर तुम्ही एखाद्या व्यवसायात भागीदारी केली असेल तर त्या व्यवसायात तुमची फसवणूक होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी मैत्रिणी तुमच्या कामात तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. राजकारणात काम करणाऱ्या लोकांना काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. तुमचं मन देवाच्या भक्तीमध्ये पूर्णपणे गुंतलेलं असेल, जे पाहून तुमचे कुटुंबीय आनंदी होतील.
तूळ रास (Libra Today Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज कोणाच्याही वादविवादात विनाकारण पडू नका. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीबद्दल वाईट वाटू शकतं. तसेच, तुम्हाला तुमच्या मुलांवर जास्त लक्ष द्यावं लागेल. आज कोणतीही महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा अट्टाहास करु नका. घाईगडबडीत गडबड होण्याची शक्यता आहे. तसेच, आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. नियमित योग, व्यायाम,ध्यान करा.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नुकसानकारक असणार आहे. आज तुम्हाला नवीन कार्य सुरु करण्याची इच्छा वाटू शकते. मात्र, आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करु नका. तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेलं तुमचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातील भावना तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रीणींशी शेअर करा. लवकरच यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रचंड उत्साहाचा असणार आहे. पण, तुमच्या या ऊर्जेचा तुम्ही योग्य वापर करणं गरजेचं आहे. आध्यात्माच्या बाबतीत तुमची रुची वाढू शकते. तसेच, तुमच्या कामाच्या संदर्भात तुम्हाला नवीन योजना आखाव्या लागतील. आज कोणत्याही वादविवादात पडू नका. भविष्याच्या संदर्भात नीट विचारपूर्वक निर्णय घ्या. आरोग्याची काळजी घ्या.
मकर रास (Capricorn Today Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात कोणताच शॉर्टकट मार्ग स्वीकारु नका. याचा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. तसेच, तुमच्या प्रगतीत येणारे अडथळे आज दूर होण्याची शक्यता आहे. मित्रांबरोबर तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा द्याल. मानसिक शांतीसाठी योग करणं गरजेचं आहे.
कुंभ रास (Aquarius Today Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नुकसानकारक असणार आहे.आज तुमची नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. तसेच, तुमच्या मुलाच्या करिअरबाबत तुम्हाला चिंता भासू शकते. आज कौणाकडूनही पैसे उधार घेऊ नका. तसेच, संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवणं गरजेचं आहे. यातून तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तसेच, तुमचं मन शांत राहील. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.
मीन रास (Pisces Today Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय जसे की, वाहन, प्रॉपर्टी किंवा करिअरच्या संदर्भातील एखादा निर्णय घेण्याआधी तुम्ही घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी किंवा तज्ज्ञांशी बोलणं गरजेचं आहे. तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळेल. मात्र, आरोग्याच्या बाबतीत कोणतीच तडजोड करु नका. सांधेदुखीचा त्रास जाणवत असल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Horoscope Today 31 January 2025 : आजचा शुक्रवार खास; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
