Horoscope Today 31 December 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 31 डिसेंबर 2025, आजचा वार बुधवार आहे. लवकरच 2025 वर्ष संपणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षातले शेवटचे दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज कुठेही अंधविश्वास न ठेवता पैशाचा अति लोभ टाळायला हवा
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज कष्ट करण्यात थोडे कमी पडाल, आळशीपणा वाढेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये सर्वांचा मूड मौज मजा करण्याचा असेल, पण कर्ज काढून सण साजरां न करणे चांगले
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज घरात किंवा बाहेर कोणताही निर्णय पटकन घेऊ शकणार नाही
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज साहित्य, निर्मिती, कला यामध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसाल, पण धरसोड वृत्ती राहील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज इतरांना न पटणारे निर्णय अचानक घेऊन टाकाल, विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज व्यवसाय-नोकरी, कामात खूप मेहनत करावी लागल्यामुळे थकवा जाणवेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आरामात दोन-चार दिवस घालवावे याचा मोह होईल, परंतु विश्रांतीच्या काळातही स्वस्त बसवणार नाही
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये व्यवहारीपणा दिसेल, पारंपारिक विचारांना झूगारून द्याल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज जवळच्या माणसांना तुम्ही विकसित वाटण्याची शक्यता आहे, महिला निष्कारण चिंता करतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज संतती संबंधी काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर, तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्या
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची आवड राहील, परंतु एक ना धड भाराभर चिंध्या, अशी अवस्था होऊ देऊ नका.
हेही वाचा
2026 Money Horoscope: सज्ज व्हा, जानेवारीत आर्थिक स्थिती सर्वात मजबूत असणाऱ्या 4 राशी , संपत्तीत वर्षभर वाढ, मोठे सरप्राईझ, परदेश वारी, घर..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)