Horoscope Today 30 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 30 सप्टेंबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. आज शारदीय नवरात्रीची अष्टमी तिथी आहे. हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज तुम्हाला फायदेशीर वाटणाऱ्या घटना घडतील त्यामुळे मूड चांगला राहील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज जोडीदाराची उत्तम साथ मिळाल्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज घरामधील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमचा सिंहाचा वाटा असेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये ज्यादा अधिकार मिळण्यासाठी तुमची वर्णी लागेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज नियोजनबद्ध काम झाल्यामुळे समाधानी व्हाल महिला थोड्या पराधीन बनतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज भविष्यकाळातील योजना आणि वेळापत्रक तुमच्या डोक्यात पक्के असते त्यानुसार पावले उचलाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाशझोत टाकणारे ग्रहमान असल्यामुळे आपल्या सुधारणा करून प्रगती साधा
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुम्हाला उद्योगी ठेवण्यामध्ये ग्रहांची साथ मिळेल कामाची योग्य दिशा सापडेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज नवीन संधी मिळतील परंतु ती संधी आहे हे मात्र ओळखायला हवे
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज पैसा मिळवण्याचे अनेक पर्याय समोर उपलब्ध असतील त्याचा फायदा करून घेतल्यास आर्थिक परिस्थिती सुधारेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज स्वतःच्या कुबतीवर विश्वास असल्यामुळे स्वतःच स्वतःला प्रेरणा आणि स्फूर्ती द्याल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीच्या संधी चालून येतील.
हेही वाचा :
Weekly Horoscope: नवा आठवडा सुरू! 'या' 6 राशींचे नशीब पालटणार, बॅंक बॅलेन्स होणार दुप्पट, सौभाग्याचा आठवडा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)