Horoscope Today 30 January 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 30 जानेवारी 2026, आजचा वार शुक्रवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज कामामध्ये बऱ्याच सुधारणा कराल, त्यामुळे उत्पन्न वाढेल, पण हातात पैसे यायला वेळ लागेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील, वैवाहिक जीवनात आनंदाचे वारे वाहतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज घरातील वातावरण सुधारेल, अहंकार ठेवलात तर मात्र त्रास होईल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज प्रतिष्ठेसाठी पोकळ डौल करण्यात काहीच अर्थ नाही, विद्यार्थ्यांनी अविचार करू नये
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज नोकरीमध्ये अधिकार योगास पात्र ठराल, राजकारणात पुढे जाणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावं की, बुद्धीच्या कसरतीचा उपयोग भावनेपेक्षा तुम्हाला जास्त होईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज महिलांनी जास्तीत जास्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, पूर्वी मांडलेले आर्थिक अडाखे सफल होतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज जुनी येणी वसूल होतील आणि हातात पैसा येईल, फक्त पैसा कुठे खर्च करायचा, याचे योग्य नियोजन करा
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या लहरी स्वभावाचा अनुभव इतरांना येईल, तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टींमुळे तुम्ही धडाडी दाखवाल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज सर्वत्र तुमचे कौतुक होईल, व्यवसाय समय सूचकता आणि हजर जबाबीपणामुळे अनेक लोकांची मनी जिंकून घ्याल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज चाकोरी बाहेरच्या गोष्टी करण्याचे धाडस न केलेलेच बरे, तुमचा प्रत्येक गोष्टीतील आग्रह तुम्हाला तुमच्या इच्छेकडे घेऊन जाईल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज महिलांच्या हातून बजेटपेक्षा जास्त पैसे खर्च होतील, जास्तीत जास्त धार्मिकतेकडे कल राहील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगल्यापैकी ओढ लागेल, नोकरीत व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन केली जाईल.
हेही वाचा
Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी फेब्रुवारी महिना कसा जाणार? कोणत्या राशींची लॉटरी? मासिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
