Continues below advertisement

Horoscope Today 3 October 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 3 ऑक्टोबर 2025, आजचा वार शुक्रवार आहे. दसऱ्यानंतरचा आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज मुलांच्या वागणुकीमुळे त्रस्त व्हाल, काही ठोस निर्णय घ्याल

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याबद्दल सुप्त दरारा निर्माण कराल, महिलांचा चैनीकडे कल राहील

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये शांतता ढवळून निघण्याचे प्रसंग येतील, वडिलोपार्जित इस्टेटचे वाद चिघळतील

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज आर्थिक गणित कोलमडल्यामुळे थोडे अस्वस्थ व्हाल, बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज तुमच्यातील गुणांचे चीज न झाल्यामुळे थोडे निराश व्हाल, महिलांना त्रासदायक गोष्टींना सामोरे जावे लागेल

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज नोकरी धंद्याच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल, खूप दिवस एखादी अडकलेली ऑर्डर हातात पडेल

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज अनेक गोष्टींचा लाभ मिळेल, परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज आर्थिक अडचण दूर झाल्यामुळे बऱ्याच जणांचे हात उसने घेतलेले पैसे देऊन टाकाल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांना आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल संवाद वाढेल

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना मनासारख्या क्षेत्रात प्रवेश मिळाल्यामुळे उत्साह वाढेल, महिला परिस्थितीनुसार आचरण ठेवतील

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज काही कारणामुळे स्वतःला थोडा त्रास करून घ्याल, विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात काम करण्यासाठी उत्तम ग्रहमान

हेही वाचा :           

Shani Transit 2025: दसरा होताच 'या' 3 राशींची पाचही बोटं तुपात! शनिचा नक्षत्र बदल बनवणार कोट्यधीश, करिअर जोरात, बक्कळ पैसा येण्याचे संकेत

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)