Horoscope Today 3 March 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 3 मार्च 2024, रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....


तूळ (Libra Today Horoscope) 


तुमचा आजचा दिवस सामान्य असेल अशी अपेक्षा आहे. जोडीदारासोबतचे प्रेमसंबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात काही कारणावरून तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आर्थिक समस्या कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. काम वेळेवर न झाल्यामुळे मानसिक तणाव कायम राहू शकतो. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत थोडा वेळ घालवू शकाल. आज मानसिक आरोग्याची काळजी घ्या.


वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  


नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आज तुमच्या नोकरीत तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी प्रवास करू शकता. आज बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नका, अन्यथा खर्च वाढल्याने अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. आज कुटुंबातील सदस्यांशी मतभेद संभवतात. जमीन आणि घर खरेदी-विक्रीचा विचार करता जाईल. व्यवसायात मोठे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात, ज्यामुळे ते आनंदी होतील. आरोग्याबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे.


धनु (Sagittarius Today Horoscope)


आज तुम्हाला किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. हनुमानाची पूजा केल्याने दिवस चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्या लागतील. व्यवसायात आर्थिक लाभ अपेक्षित आहे. तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल शंका असू शकते. आज तुमच्या एखाद्या कामात काही अडचण येऊ शकते. आज तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत चिंतित असाल. आज तुमच्या कुटुंबातील कोणीतरी आजारी असेल ज्यामुळे तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shani Dev : 'या' 10 गोष्टींचं पालन करणाऱ्यांना शनि कधीच देत नाही त्रास; वेळ आल्यावर देतो भरघोस सुख