Horoscope Today 2 February 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 2 फेब्रुवारी 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज महिलांनी भावना प्रगट करताना संयम राखावा, तुमच्या वागण्या बोलण्यात संघर्षाचा प्रतिकराचा भाग जास्त राहील 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज दुसऱ्याच्या मताशी लवकर सहमत होणार नाही, भावनांशी थोडी वाद संभवतात 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज व्यापारात सतत काहीतरी उलाढाल करण्यात गुंतून जाल, परंतु त्यामधील काही गुप्त गोष्टी ठेवण्याकडे कल राहील 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज कानाचा त्रास असणाऱ्यांनी डॉक्टरी उपचार वेळेवर घ्यावेत, घरगुती कारणासाठी लहान मोठे प्रवास करावे लागतील 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज आपल्या विचारांशी पक्के राहाल, त्यामुळे समोरच्या लोकांना तुम्ही हटवादी वाटू शकता 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशींच्या लोकांसाठी आज आशावादी दृष्टिकोन ठेवल्यामुळे बरीच कामे मार्गी लावाल, पैसा मिळवण्या संदर्भात मोहाचे क्षण बाजूला करावे लागतील 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्याकडे असलेले ज्ञान इतरांना देण्याची संधी चालून येईल, त्यामध्ये मान अधिकार मिळेल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज वडिलांकडून मदत मिळेल, अति विचारामुळे डोकेदुखी निर्माण होईल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज राजकारणी लोकांना आपली मते समाजापुढे मांडण्याची संधी मिळेल, महिला अति व्यवहारी बनतील 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्यातील रसिकता लोकांना कळेल, कलाकारांना आपली कला लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज मान सन्मान मिळेल, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उल्हासित वातावरण लाभल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज पैशाची कामे वेळेवर होऊन आर्थिक स्थिती चांगली राहील, नोकरीत अधिकाराच्या जागा मिळतील

हेही वाचा

Lucky Zodiac Signs: याला म्हणतात नशीब! 3 फेब्रुवारी तारीख 5 राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)