Horoscope Today 3 April 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 3 एप्रिल 2026, आजचा वार शुक्रवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. लक्ष्मी-नारायणाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस वेळेचे गणित प्रयत्नपूर्वक बसवावे लागेल, त्यामुळे घरी आणि बाहेर सर्वांनाच वेळ देऊ शकणार आहात 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल, महिलांना संततीशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागतील 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस प्रवासाला जायचे योग आले तरी प्रकृतीसह सर्व गोष्टींची काळजी घ्यायला हवी 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीसाठी आजचा दिवस आर्थिक गुंतवणूक करण्याचे निर्णय घाईघाईने न घेता, तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितावह ठरेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस मित्रमंडळींच्या भेटीसाठी होतील आणि पैसाही खर्च होईल, पूर्वी केलेल्या कष्टांचे चीज होईल आणि प्रसिद्धी मिळण्याच्या संधी चालून येतील 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीसाठी आजचा दिवस भावंडांकडून सहकार्याची अपेक्षा न ठेवणे चांगले, व्यवसायात एखादी गोष्ट सलग सातत्याने करणे थोडे जड जाईल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीसाठी आजचा दिवस वाईटतून चांगले घेण्याची गुणग्राहकता आज ठेवायला हवी, महिला घरातील प्रत्येकाच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस आरोग्यदायी जीवन जगायचे असेल तर, पथ्य पाणी सांभाळणे आवश्यक आहे, नियमित व्यायाम प्राणायाम यावर भर द्यावा 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीसाठी आज प्रकृती वाणी जपून चालवा, उत्तम नियोजन करून कामे संपायला हवीत, यासाठी जोडीदाराचे सह कार्य उत्तम मिळेल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस घरामध्ये दुरुस्तीची कामे निघतील, त्यासाठी पैसा खर्च करावा लागेल, केवळ भावनेच्या आहारी जाल तर कर्तव्याचा कळस गाठता येणार नाही 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस दुसऱ्या मधील गुण पाहिलेत तर मानसिक त्रास कमी होईल, महिलांनी स्वतःच्या मनाचा कौल घेणे आवश्यक ठरेल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस ज्यांना परदेश गमन करण्याची इच्छा आहे, त्यांनी अवश्य प्रयत्न करावेत, प्रवासाचे योग येतील.

हेही वाचा

Numerology: कमालीचा Sixth Sense, 'या' जन्मतारखा सर्वात पॉवरफुल! केतूचा प्रभाव, शांत स्वभावाचे, भविष्यातील घटनांचा अंदाज लावतात? अंकशास्त्रात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)