Horoscope Today 29 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 29 सप्टेंबर 2025, आजचा वार सोमवार आहे. आज शारदीय नवरात्रीची सप्तमी तिथी आहे. हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज तुमच्या जवळच्या माणसांच्या मनात तुमच्याबद्दल सुप्त आधाराची किंवा भीतीची भावना तुम्हाला जाणवेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज अति भावनाप्रधानतेचे फायदे तोटे अनुभवाला येतील, जोडीदाराने मांडलेले प्रस्ताव फार उशिरा पडताळून पाहिल्यामुळे ताण जाणवेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज अगदी जवळच्या मित्राच्या बाबतीत भावनांचा आधार घ्यावा की कर्तव्याला महत्त्व द्यावं, या संभ्रमात पडाल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज सुखाच्या तुमच्या कल्पना इतरांपेक्षा वेगळा राहिल्यामुळे नात्यांमधील दुरावा निर्माण होऊ शकतो
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज व्यापारात आर्थिक प्रमाण वाढवण्यासाठी भरपूर मेहनत घेण्याची तयारी दर्शवाल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज आज तुमच्या विचारांना चांगला प्रतिसाद मिळेल, महिला थोड्या चाकोरी बाहेर वागतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्या नवनवीन भन्नाट कल्पना लोकांच्या पचनी लवकर न पडल्यामुळे थोडी आग्रही भूमिका ठेवाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रचंड आतल्या गाठीचे असा शिक्का तुमच्यावर पडलेला आहे, तो तुम्ही आज सार्थ करून दाखवाल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष संधी मिळतील, कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज व्यापारात काहीतरी नाविन्यपूर्ण कामे करण्याचा इरादा बाळगाल, परंतु तुमचे यश प्रयत्नांच्या प्रमाणावर अवलंबून राहील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज अविचाराची लक्ष्मण रेषा ओलांडली नाहीत तर फायद्याचे प्रमाण वाढेल, महिला जरा जास्त तापटपणा करतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज कोणताही समस्येला पाठीवर घेण्याची ताकद तुमच्यामध्ये राहील, तरुण वर्गात नवीन ओळखी होतील.
हेही वाचा :
October 2025 Lucky Zodiac Signs: ऑक्टोबर महिना 'या' 5 राशींचे भाग्य घेऊन येतोय! आदित्य मंगल योग संपत्ती दुप्पट करणार, पैसा हातात खेळेल, मासिक भाग्यशाली राशी
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)