Horoscope Today 29 November 2024 : पंचांगानुसार, आज 29 नोव्हेंबर 2024, शुक्रवारचा दिवस. आजचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


आज कोणतेही काम करण्यात तत्पर राहाल जिथे जाल तिथे आनंद निर्माण कराल. 


वृषभ रास  (Taurus Horoscope Today)


नोकरीच्या ठिकाणी हलकेफुलके वातावरण राहिल्यामुळे काम करावेसे वाटेल. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


आज काम ऐवजी इतर गोष्टींमध्येच वेळ जास्त जाईल. स्वतंत्र काम करण्यापेक्षा सामूहिक काम करण्याची मनस्थिती राहणार आहे. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


धरलं तर चावतो आणि सोडलं तर पळत अशी अवस्था झाल्यामुळे द्विधा मनस्थितीत राहाल. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


घरामध्ये एकमेकांमध्ये असलेली मतभिन्नता थोडा ताण निर्माण करणार आहे. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


आज थोडे सबुरीचे धोरण स्वीकारा तरुण वर्गाला हवेत उडायला लावणारे ग्रहमान आहे. 


तुळ रास (Libra Horoscope Today)


मैदानी खेळ खेळणाऱ्यांना आपली कला सिद्ध करता येईल. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


महिलांनी मानापमानाच्या जंजाळात फार अडकू नये. लहरीपणा सोडावा लागेल. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


आज थोडी अस्वस्थता वाटेल.दुसऱ्याचे भले करायला जाल परंतु समाधान मिळणार नाही. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


सर्व परिस्थितीत डोके शांत ठेवून मार्ग काढावा लागेल महिलांनी सामोपचाराचे धोरण ठेवावे. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


नोकरी व्यवसायात उत्तम संधी येऊन सुद्धा संघर्षात्मक परिस्थिती राहील. 


मीन रास  (Pisces Horoscope Today)


आज नव्या वाटा सात घालतील त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा खोलवर उमटवणार आहात.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Shani Gochar : नवीन वर्ष 2025 'या' 3 राशींसाठी ठरणार लकी; विविध स्त्रोतांमधून होणार प्रगती, मार्गातील अडथळे होतील दूर