Horoscope Today 29 December 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 29 डिसेंबर 2025, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज कुठेही अव्यवहारी वागून चालणार नाही आजचे सोडून पळत्याच्या मागे धावलात तर हाती काही पडणार नाही.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
तुम्हाला पुष्कळ काही करायचं असेल परंतु शक्ती पैसा आणि परिस्थिती या सर्व गोष्टींचा विचार करून पावले उचला.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
तरुणांना प्रेमात पडण्यासाठी संधी चालून येतील योग्य जोडीदार मिळण्यासाठी प्रयत्न कराल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज कुठेही निर्णय प्रत येऊ शकणार नाही महिलांना म्हणावी अशी भाग्याची साथ मिळणार नाही.
सिंह रास (Leo Horoscope Today)
तुमचे ध्येय आणि योजना चांगले असल्या तरी अव्यवहारी असल्यामुळे प्रत्यक्षात उतरू शकणार नाही.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आज तुम्हाला तुमच्या मनासारखे दान पडणार आहे अंगात धडाडी संचारेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
कोणालाही न जुमानता कामाला लागाल वैवाहिक जीवन रुळावर येईल एकमेकांना समजून घ्या.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
थोडी अस्थिर आणि चंचल मनोवृत्ती राहील प्रकृतीला सांभाळावे लागेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमी पडेल कामाच्या ठिकाणी गिऱ्हाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवा.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
नोकरीमध्ये वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे गोंधळात पडल्यासारखे वाटेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आज बडबड जास्त आणि काम कमी झाल्यामुळे स्वतःच्याच प्रगतीला खीळ घालाल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
प्रेमवीरांना आपल्या भावना व्यक्त करायला योग्य जोडीदार भेटल्यामुळे उत्साह संचारेल.
हे ही वाचा :
January 2026 Monthly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जानेवारी महिना नेमका कसा जाणार? कोणत्या राशींना लागणार लॉटरी? पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य