Horoscope Today 28 January 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 28 जानेवारी 2026, आजचा वार बुधवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज प्रवासाचे योग येतील, परंतु प्रवासामध्ये प्रकृती, वस्तूंची काळजी घ्यावी
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज कोणती महत्त्वाची गुंतवणूक न केलेली बरी, तज्ज्ञांचा सल्ला घेतला तरी थोडे थांबणे श्रेयस्कर ठरेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये तुमच्या कामाचा फायदा लगेच मिळेल, अशी अपेक्षा ठेवू नका
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज तुम्ही केलेल्या कामाचा भविष्यकाळात उपयोग होईल, तुमच्या अंगाच्या धडाडीचा मात्र फायदा होईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज तुम्हाला उत्साही बनवणारे लोक आजूबाजूला भेटतील, त्यांचा फायदा घ्या
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज महिलांनी जास्त क्रियाशील बनावे, किरकोळ मुद्द्यांवर तात्विक वाद उकरून काढाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज इतरांना होणाऱ्या त्रासाची अजिबात पर्वा करणार नाही, त्यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जातील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या क्षेत्रात अधिकचे काम करायला लागू शकते. परंतु त्यासाठी लगेच संधी मिळणार नाहीत
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज हातून उत्तम कलाकृती घडतील उत्साही आणि आनंदाने काम कराल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज एक प्रकारचे बौद्धिक समाधान लाbheल बौद्धिक आणि मानसिक उन्नती होईल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज नावलौकिक मिळेल, घरामध्ये एखादी चांगली खरेदी कराल त्यामुळे सर्व खुश राहतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज महिलांचे सर्वांशी सख्ख्य राहील, जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो.
हेही वाचा
February 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी फेब्रुवारी महिना नशीब पालटणारा! कोणत्या राशी होतील मालामाल? मासिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)