Horoscope Today 28 January 2025 : पंचांगानुसार, आज 28 जानेवारी 2025, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
तुमच्या हुशारी आणि कल्पकतेमुळे यशाला खेचून आणाल.
वृषभ (Taurus Horoscope Today)
व्यवहारात थोडा विसरभोळेपणा केल्यामुळे महत्त्वाच्या कामांमध्ये दिरंगाई होईल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
रागावर ताबा ठेवणे आवश्यक ठरेल. लेखकांनी त्यांच्या लिखाणामुळे कुठले घोटाळे होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
कर्क (Cancer Horoscope Today)
आपल्याला योग्य न्याय मिळत नाही हे लक्षात येईल, परंतु अति कष्टाची मानसिकता नसल्यामुळे थोडे मागे पडाल.
सिंह (Leo Horoscope Today)
सरकारी कामे मार्गी लागतील. नोकरी, व्यवसायात नक्की काय केले असता वरिष्ठ खूश होतील याचा विचार करावा लागेल.
कन्या (Virgo Horoscope Today)
तुमच्या दिलदार स्वभावाचे दर्शन लोकांना घडेल. महिलांच्या हातून लिखाण होऊ शकते.
तूळ (Libra Horoscope Today)
स्वतःचा मान कसा राखावा यासाठी तत्पर राहणार आहात. सुख शांती समाधानाचा आनंद घ्याल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
फार मोठा संघर्ष न करता काम करण्याची पद्धत राहील. प्रकृती चांगली राहील.
धनु (Sagittarius Horoscope Today)
आज एक प्रकारचा उत्साह अंगात संचारेल. बौद्धिक कसरती करण्यामध्ये तत्परता ठेवाल.
मकर (Capricorn Horoscope Today)
आपल्या स्वभावामध्ये थोडी सुधारणा करावी लागणार आहे. महिलांच्या गृहसौख्यात भर पडेल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासामध्ये सुधारणा झाल्याचं लक्षात येईल. सातत्याने एकाग्रता वाढवायचा प्रयत्न करा.
मीन (Pisces Horoscope Today)
बाजारातील चढ-उतारांचा अंदाज घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: