Horoscope Today 26 March 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 26 मार्च 2026, आजचा वार गुरूवार आहे. आज राम नवमीचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीरामांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आजचा दिवस एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर रागाचा पारा लगेच चढेल, परंतु त्यामुळे ब्लडप्रेशर वाढण्या व्यतिरिक्त काहीही होणार नाही
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस पैशाची परिस्थिती मनाजोगती सुधारेल, त्यामुळे थोडे मनस्वास्थ्य ही मिळेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस घरामध्ये तुम्ही मांडलेल्या मतांमधून काहीतरी चांगले निष्पन्न होईल आणि ते सर्वांच्या फायद्याचे असेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीसाठी आजचा दिवस महिलांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करता येणार नाही, परदेश गमनाची इच्छा असेल तर व्यवस्थित कागदपत्रे तयार करा
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीसाठी आजचा दिवस अनेक बाबतीत अडचणी येण्याची शक्यता जास्त, दैव देतं आणि कर्म नेतं अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीसाठी आजचा दिवस उत्तम योग्यता असली तरी योग्य संधी न मिळाल्यामुळे, अति कष्ट करूनही यश मिळेलच असे सांगता येत नाही
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीसाठी आजचा दिवस व्यवसायात विलंबाने शत्रूंना तोंड द्यावे लागेल, तरीसुद्धा उशिराने का होईना स्थैर्य लाभेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस राजकारणामध्ये असणाऱ्या व्यक्तींना योग्य संधी मिळतील, नोकरीत खूप काम केल्यानंतर वरिष्ठ तुमचा विचार करतील
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीसाठी आज जुन्या मतांच्या लोकांशी गाठ पडेल, त्यामुळे कोणत्याही आधुनिक विचारांचा मागोवा आज घेता येणार नाही
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीसाठी आजचा दिवस महिलांचा काटकसरीपणा इतरांच्या लक्षात येईल, स्वामित्वाची भावना तुमच्यामध्ये असली तरी त्याला हळव्या भावनेची किनार राहणार आहेच
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात संघर्षाचा आणि प्रतिकाराचा भाग जास्त असल्याने छोट्या छोट्या कारणावरून तापटपणा वाढेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीसाठी आजचा दिवस दुसऱ्याचा विचार न करता थोडा हट्टीपणा वाढू शकतो, जेवढा अहंकार जास्त ठेवाल तेवढे स्वतःचे नुकसान करून घ्याल,
हेही वाचा>>
Mangal Ast 2026: शनि पाठोपाठ आता मंगळाचा अस्त! तब्बल 182 दिवसांनी 4 राशींची मज्जा, मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर, करिअर जोरात, पैसा डबल...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
