Horoscope Today 26 April 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 26 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार शनिवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आज जुन्या पारंपारिक विचारांचा पगडा तुमच्यावर असेल, त्याप्रमाणे आचरण कराल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज जवळचे लोक तुमच्या बाबतीत संभ्रमात पडतील. आर्थिक बाबतीत थोड्या अडचणी निर्माण होतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिला जास्तच काटकसरी बनतील. धार्मिक गोष्टींकडे कल जास्त वाढेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज दुसऱ्याला मदत करण्यात अग्रेसर राहाल रुढीप्रिय व्यक्तींच्या सहवासात आल्यामुळे तुमच्यावर त्यांचा पगडा राहील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज राजकारणात असणाऱ्या व्यक्तींना हव्या त्या माणसांच्या गाठीभेटी पडतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज सामाजिक क्षेत्रात मान मिळेल, घरामध्ये तुम्ही घेतलेला निर्णय शिरोधार्य मानला जाईल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज फक्त डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर ठेवलीत, तर संवाद साधण्यासाठी उपयोगी पडेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जेवढे काम कराल त्या मानाने लाभ हवा तेवढा मिळणार नाही, ज्यांना त्वचारोगाचे विकार आहेत त्यांनी डॉक्टरांनी सल्ला घ्यावा
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज महिलांना स्वाभिमान थोडा बाजूला ठेवावा लागेल, जोडीदाराबाबत नसत्या चिंता करायला
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज व्यवसायात पार्टनरच्या बाबतीत गैरसमज होण्याची शक्यता आहे, नोकरी धंदा किंवा करिअर बाबत बरीच स्वप्न रंगवाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज चिंता करण्याजोगी गोष्ट नसेल, अशाही गोष्टींची चिंता कराल आणि मनस्वास्थ्य हरवून बसाल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, वाङ्मयाचा ज्यांना छंद आहे त्यांना चांगली पुस्तके वाचायला मिळतील.