Horoscope Today 25 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 25 सप्टेंबर 2025, आजचा वार गुरूवार आहे. आज शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस जरी असला तरी तिथी तृतीया आहे. हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज प्रवासाला जावे लागले तर, काळजी घ्यावी लागेल, जोडीदाराशी जमवून घ्या
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज बरोबरीचे लोक पुढे जाताना बघून तुमची बरीच घुसमट होईल, तुमच्या गुणांची कदर न झाल्यामुळे थोडे खट्टू व्हाल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिलांना अडीअडचणीतून जावे लागेल. घरामध्ये तरुण वर्गाची ये-जा वाढेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज कलाक्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल, आपल्या कलेचा अभिमान वाटावा अशा कलाकृती हातून निर्माण होतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज व्यवसायात साम दाम दंड भेद या नीतीने वागून तुम्ही ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण कराल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज थोडी आर्थिक चिंता असली तरी, आवश्यक तेवढी पैशाची तरतूद नक्कीच होईल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये केवळ फायद्यावर डोळा ठेवून नवीन काम स्वीकारू नये. आज तुमची कामे सहजगत्या होतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज शत्रूला पूर्णपणे कोंडीत पकडून प्रहार करण्यावर तुमचा जोर राहील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज कामे कमी कष्टात विशेष त्रास न पडता पूर्ण होतील, नशीबाची साथ यासाठी खूप चांगली मिळेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज कौटुंबिक सुख मिळेल, वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज उदाहरण वृत्तीमुळे ओळखी जास्त होतील, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या तालावर नाचावे लागले तरी काम फत्ते केल्यामुळे त्यांची मर्जी राहील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज प्रेमी जणांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी राहाल, विवाह जमतील.
हेही वाचा :
Raj Yog 2025: नवरात्रीच्या महानवमीपूर्वी 'या' 4 राशींवर धनाची उधळण! जबरदस्त 5 राजयोगांचा महासंगम, श्रीमंतांच्या यादीत सामील होण्याची वेळ
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)