Horoscope Today 25 February 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 25 फेब्रुवारी 2026, आजचा वार गुरूवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीविठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज स्त्री वर्गाकडून फायदा होईल, अध्यात्माची आवड असणाऱ्यांची उपासना मार्गात प्रगती होईल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती सुधारेल, ज्या गोष्टींची इच्छा कराल त्याची इच्छापूर्ती होईल 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज तरुण आधुनिक फॅशनकडे ओढ घेतील, मोठ्या भावंडांबाबत फायद्याच्या गोष्टी घडतील 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज महिला कामाला जास्त महत्त्व देतील, संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज अनावश्यक पैसा खर्च होऊ शकतो, आर्थिक घरी व्यवस्थित असली तरी पैशाला अनेक वाटा फुटतील 

कन्या रास (Virgo Horocsope Today)

कन्या राशींच्या लोकांसाठी आज थोडा मनस्ताप सहन करावा लागेल, वैवाहिक जीवनात वादळी निर्माण होतील, परंतु समजूतीचे धोरण उभयतांनी ठेवायला हवे 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, बुद्धीच्या आणि संपत्तीच्या जोरावर कोणाची फसवणूक करू नये 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज मनाचा कौल सर्वात महत्त्वाचा, लोक टीका करतात म्हणून काळजी करू नका 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज महिला जे ठरवतील, त्यापेक्षा वेगळीच कृती करतील, ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी पथ्य पाणी वेळेवर सांभाळावे 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज बोलण्यावर नियंत्रण ठेवायला हवे, शक्ती पेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ ठरते हे लक्षात ठेवा, त्याप्रमाणे कृती करा 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज अचानक खर्च उद्भवतील, विद्यार्थ्यांना नवीन कल्पना सुचतील 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज कोणतेही आर्थिक नियोजन तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करू नका, नोकरीत मनस्तापचे प्रसंग येतील

हेही वाचा,

March 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचं भाग्य रातोरात फळफळणार! मार्च महिना कसा जाणार? पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)