Horoscope Today 24 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 24 सप्टेंबर 2025, आजचा वार बुधवार आहे. आज शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज घरामध्ये हलकेफुलके आणि प्रेमळ वातावरण राहील, घरात पाहुण्यांची ये जा राहील.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज दोन पिढ्यांमधील अंतर तुम्हाला आज जाणवेल, स्थावर इस्टेटिसंबंधी प्रश्न मात्र रखडतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिला कुटुंबातील व्यक्तींसाठी कष्ट करण्यात धन्यता मानतील, कामाच्या वेळी फक्त कामch करणे इष्ट ठरेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज धंद्याच्या ठिकाणी तुम्हाला हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल, परंतु याचा लाभ पदरात पडण्यासाठी झगडावे लागणार आहे
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज दुसऱ्या मधील अवघड शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये असलेल्या मुलांचा विकास करण्यावर भर द्यावा
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यावर टीका करताना दुसऱ्याच्या मनाचा विचार करावा, असा ग्रहांचा संदेश आहे
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या हत्ती आणि देरागृही स्वभावामुळे तोटा होण्याचा संभव आहे, महिलांना कोणाचाही विरोध सहन होणार नाही
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज एखादी अप्रिय गोष्ट घडली, तर त्या संबंधित चिडचिड न करता, त्या गोष्टीचा उमदेपणाने स्वीकार करा
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज जशी परिस्थिती असेल त्यामध्ये बदल करण्याचा मार्ग पत्करा, व्यवसायात सतत काहीतरी उलाढाल करीत राहाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत. तोपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही, तुमची मते दुसऱ्याला पटवून देण्यात आपला वेळ आणि शक्ती खर्च कराल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील जवळच्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
हेही वाचा :
Lucky Zodiac Signs: 24 सप्टेंबर तारीख अद्भूत! जबरदस्त महालक्ष्मी राजयोग बनतोय, 'या' 3 राशींचे नशीब पालटलेच म्हणून समजा..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)