Horoscope Today 24 November 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 24 नोव्हेंबर 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार सोमवार आहे. हा दिवस आपण भगवान शंकराला (Lord Shiva) समर्पित करतो. आजच्या दिवशी भक्त मंदिरात जातात आणि महादेवाची पूजा करतात. तसेच, पुण्य कर्म मिळावं यासाठी प्रार्थना करतात. आजच्या दिवस अनेक उपवासही केले जातात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील हा दिवस महत्त्वाचा आहे. कारण या दरम्यान अनेक मोठे ग्रह संक्रमण करणार आहेत. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement


मेष रास (Aries Horoscope Today)


लेखन केले प्राविण्य मिळेल विद्यार्थ्यांना वाचन लिखाणाची आवड उत्पन्न होईल.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


जवळच्या लोकांना भरपूर सहकार्य केल्यामुळे सर्वजण खुश होतील दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हाल.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


उत्कृष्ट कल्पनाशक्तीमुळे नोकरी व्यवसायात आवश्यकते बदल कराल.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


महिला जास्तच मवाळ होतील विधायक आणि रचनात्मक कामांकडे ओढा जास्त राहील.


सिंह रास (Leo Horoscope Today)


नवीन प्रॉपर्टी संबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही.


कन्या रास (Virgo Horoscope Today)


बौद्धिक बाबतीत दिवस चांगला जाईल नोकरी व्यवसायात इतर लोकांचे डावपेच ताबडतोब लक्षात येतील.


तूळ रास (Libra Horoscope Today)


आज तुमच्यासमोर गुप्त शत्रूंचे काही चालणार नाही पैशाची आवक चांगली राहील.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश येईल एखाद्या आवडत्या व्यक्ती जवळ आपले मनोगत व्यक्त करायला हरकत नाही.


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी व्यायाम व औषध उपचारावर भर द्यावा.


मकर रास (Capricorn Horoscope Today)


आज देश कसा देश ठेवाल ज्यांना लेखनाची कला अवगत आहे त्यांनी अवश्य लिखाण करावे.


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


नोकरी व्यवसायात भाग्याची साथ मिळेल नोकरी बदल करण्याची इच्छा असणाऱ्यांनी प्रयत्न करावेत.


मीन रास (Pisces Horoscope Today)


आज थोडा ताण येण्याची शक्यता आहे जे विद्यार्थी संशोधन क्षेत्रात काम करतात त्यांना नवीन कल्पना सुचतील.


हे ही वाचा :                       


Weekly Horoscope : तूळ ते मीन राशींसाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा ठरणार गेमचेंजर; हातात पैसा येणार की जाणार? साप्ताहिक राशीभविष्य