Horoscope Today 23 January 2025 : पंचांगानुसार, आज 23 जानेवारी 2025, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
तुमच्या तडफदार व्यक्तिमत्त्वाला सखोल चिंतनाची साथ मिळेल.
वृषभ (Taurus Horoscope Today)
आज नवीन कल्पनांना जन्म द्याल. बौद्धिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करू शकाल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
व्यापारी वर्गाने सरकारी नियम आणि कायदे यांचे बंधन काटेकोरपणे करावे.
कर्क (Cancer Horoscope Today)
नवीन कामे स्वीकारताना त्यातील तांत्रिक गोष्टींचा अंदाज घ्यावा लागेल.
सिंह (Leo Horoscope Today)
विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वास बाळगू नये. आर्थिक बाबतीत सावध राहावे.
कन्या (Virgo Horoscope Today)
स्वतःवर फार विश्वास न ठेवता योग्य दिशेने काम करायला हवे.
तूळ (Libra Horoscope Today)
कुठेही अंधविश्वास न ठेवता पैशाचा अति लोभ आज टाळावा लागेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
आज कष्ट करण्यात थोडे कमी पडाल. आळशीपणा वाढेल.
धनु (Sagittarius Horoscope Today)
अध्यात्मिक उन्नती साधाल. घरामध्ये सर्वांचा मूड मौजमजा करण्याचा असेल.
मकर (Capricorn Horoscope Today)
आज ऋण काढून सण साजरा न करणे चांगले राहील. घरात किंवा बाहेर कोणताही निर्णय पटकन घेऊ शकणार नाही.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
अडचणीतून मार्ग काढण्यासाठी इतरांना न पडणारा निर्णय अचानक घेऊन टाकाल.
मीन (Pisces Horoscope Today)
साहित्य निर्मिती, कला आणि विज्ञानामधील नवनवीन प्रयोग कराल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: