एक्स्प्लोर

Horoscope Today 22 January 2026 : आज माघी गणेश जयंतीच्या दिवशी 5 राशींचं भाग्य उजळणार; बाप्पाच्या कृपेने अचानक होणार धनलाभ, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 22 January 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 22 January 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 22 जानेवारी 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार गुरुवार आहे. आजचा दिवस हा दत्तगुरुंना समर्पित आहे. त्यानुसार आज दत्तगुरुंची पूजा केली जाते. आणि उपवास ठेवून मनातील इच्छा व्यक्त केली जाते. तसेच, आज माघी जयंती देखील आहे. आजच्या दिवशी गणपतीचं घरी आगमन केलं जातं. पूजन केलं जातं. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. तसेच, जे लोक बेरोजगार आहेत त्यांना लवकरच चांगला रोजगार मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचं वातावरण राहील.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी दिवसाची सुरुवात शुभकारक असणार आहे. आज तुम्हाला अशी व्यक्ती भेटेल जी तुमच्यामध्ये सकारात्मक बदल निर्माण करेल. राजकारणात तुम्हाला यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं वर्तन तुमच्याप्रति चांगलं असेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या करिअरच्या संदर्भात शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. प्रामाणिकपणे आजचा दिवस जगाल. अनेक गोष्टी निरीक्षणातून तुम्हाला कळतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. काही महत्त्वाच्या योजना तुम्ही राबवाल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तसेच, महत्त्वाची कामे तुमची वेळेत पूर्ण होतील. मित्रांचं सहकार्य मिळेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवता येईल. अनेक आठवणींना उजाळा द्याल. तसेच, समाजात देखील तुम्हाला मान-सन्मान मिळेल. हाती घेतलेलं कार्य वेळेत पूर्ण कराल.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमच्यातील कलागुणांना चांगला न्याय मिळेल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच मनासारखी नोकरी मिळेल. भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ नका. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. मात्र, व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल. तसेच, तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवून काम करावं लागेल. मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. शेअर बाजारात तुम्ही गुंतवलेल्या पैशांतून तुम्हाला लाभ मिळणार नाही. तसेच, राजकीय प्रकरणातही तुम्ही फसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना नीट विचार करा. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस भावनात्मक असणार आहे. आज तुम्हाला धार्मिक यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या हातून अनेक चांगले कार्य घडतील. तसेच, संध्याकाळ नंतरचा काळ फार इमोशनल असण्याची शक्यता आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग खुले होतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे आज पूर्ण करु शकता. तुमच्या करिअरला वेगळं वळण लागेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असल्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी दिवसाची सुरुवात चांगली असेल. पण, जसजसा दिवस पुढे जाईल तुमची घालमेल सुरु होईल. एखाद्या गोष्टीच्या सतत विचाराने तुमची मानसिक शांती भंग होईल. अशा वेळी योग आणि चिंतन करणं गरजेचं आहे. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Maghi Ganesh Jayanti 2026 : माघी गणेश जयंतीला तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय; गणपती बाप्पाच्या कृपेने दूर होतील अडचणी, घरात होईल भरभराट

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 17 September 2026: आज गौरी आगमनाचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य..
आज गौरी आगमनाचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य..
Astrology: तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पिणे शुभ का मानतात? 'या' ग्रहांची बक्कळ कृपा! ज्योतिषशास्त्रातील 'हा' उल्लेख जाणून व्हाल थक्क...
तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पिणे शुभ का मानतात? 'या' ग्रहांची बक्कळ कृपा! ज्योतिषशास्त्रातील 'हा' उल्लेख जाणून व्हाल थक्क...
Ganesh Chaturthi 2026: 5 दिवस...7 दिवस किंवा 10 दिवस.. गणेश विसर्जनाचे 'हे' शुभ मुहूर्त माहितीयत? विसर्जन केव्हा आणि कसे करावे? जाणून घ्या...
5 दिवस..7 दिवस किंवा 10 दिवस.. गणेश विसर्जनाचे 'हे' शुभ मुहूर्त माहितीयत? विसर्जन केव्हा आणि कसे करावे? जाणून घ्या...
September Horoscope 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात..सप्टेंबरचे शेवटचे 15 दिवस गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात..सप्टेंबरचे शेवटचे 15 दिवस गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..

व्हिडीओ

Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report
Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी, अँकर बुकद्वारे NSE च्या तिजोरीत 6746 कोटी जमा
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी
UPI MDR :  पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचा यूपीआयवरील शुल्काला विरोध, निर्मला सीतारमण यांना पत्र पाठवलं, थेट इशारा दिला...
UPI वरील शुल्क आकारणीला पेट्रोलपंप चालकांचा विरोध, अर्थमंत्र्यांना पत्र पाठवत इशारा दिला...
Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
Embed widget