Horoscope Today 21 March 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 21 मार्च 2026, आजचा वार शनिवार आहे. नुकतीच चैत्र महिन्याला सुरूवात झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिकृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आजचा दिवस जसे बोलाल तसेच वागण्याचा प्रयत्न करावा लागेल, तुमच्याबद्दल विश्वास संपादन करण्यासाठी त्याप्रमाणे काम करावे लागेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस एकाच वेळी अनेक कामे करताना थोडा वैचारिक गोंधळ होण्याची शक्यता आहे, धंद्यामध्ये बरेच पैसे अडकल्याने त्याबाबतीत जास्त प्रयत्न करावे लागतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस तुमची धोरणे थोडी बदलावी लागतील, महिला जरा जास्त धार्मिक बनतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीसाठी आजचा दिवस कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीशी उत्तम सामना कराल, तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना गारद कराल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीसाठी आजचा दिवस कोणतेही काम विनासायास होईल, कामाचा उरक चांगला राहील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीसाठी आजचा दिवस काय काम आणि वेग याचे गणित उत्तम जमवाल, सरकारी नोकरीत प्रमोशनचे योग येतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीसाठी आजचा दिवस हाडांचे विकार हृदयविकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी, समाजात मानाचे स्थान मिळेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस तुमच्या उदाहरण वृत्तीचा अनुभव लोकांना द्याल, तुमच्यातील चांगले गुण हेरले जातील
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीसाठी आजचा दिवस अनेक माणसे जोडली जातील, महिला दुसऱ्याला जास्तीत जास्त मदत करतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीसाठी आजचा दिवस स्वतःचा आत्मविश्वास दृढ केल्यास कोणत्याही समस्येची टक्कर देण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण होईल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस नवीन विचार आजाराचा अवलंब कराल आणि व्यवसायात एक नवीन चैतन्य निर्माण कराल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीसाठी आजचा दिवस आज बरीच कामे मार्गी लागतील, समय सूचकतेमुळे अनेक तोटे तुम्ही वाचवू शकाल.
ही वाचा>>
Shani Uday 2026: कष्टाचे दिवस संपले, एप्रिलमध्ये शनिदेव बॅक टू अॅक्शन! 5 राशींचं नशीब फळफळणार, पैसा, नोकरी, प्रेमात जबरदस्त लाभ
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
