Horoscope Today 21 June 2024 : पंचांगानुसार, आज 21 जून 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज घेतलेले आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील त्यामुळे योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वडीलधाऱ्या मंडळींना तुमचे विचार पटणार नाहीत थोडे खटके उडण्याची शक्यता. महिलांनी व्यापक विचार करणे गरजेचे ठरेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याकडे कल राहील. काही सुखद घटना घडतील.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
भाग्याची साथ मिळाल्यामुळे नवीन गोष्टी करण्याची संधी आजची जाऊ देऊ नका. भरपूर प्रयत्न करा आणि यश मिळवा.
सिंह रास (Leo Horoscope Today)
मोठ्या हुद्द्यावरच्या लोकांचा फायदा करून घेतला तर मनासारखी कामे होतील परंतु तेवढेच भरपूर कष्टही करावे लागतील.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आज तुमच्या बोलण्यावर बरच काही अवलंबून राहील. सडेतोड उत्तरांमुळे इतरांच्या टीकेला पात्र ठराल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तर चला मर्यादा झाल्यामुळे जवळची पुंजी संपून जाईल. खर्चावर बंधन घालायला हवे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वैवाहिक जीवनात थोडे ताण-तणाव सहन करावे लागतील. प्रसिद्धीचे अनेक संधी उपलब्ध होतील.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
कष्टदायक दिवस. व्यवसाय धंद्यात योग्य व्यक्तींशी संपर्क ठेवण्यात यशस्वी व्हाल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
अडलेल्या कामांना गती मिळेल. प्रकृती टिकवण्यासाठी मूळ विचारात बदल करावा लागेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
मनातील ताण दर्पणाचे प्रतिसाद शरीरावर उमटल्या वाचून राहणार नाही. परंतु जे पेरलेले असेल ते नक्की उगवणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope Today)
आज ईश्वर चिंतन करायला विसरू नका म्हणजे सर्व गोष्टी सुसह्य होतील. महिला मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतील.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: