Horoscope Today 21 April 2026: आज मंगळवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! श्रीगणेशाच्या कृपेने आर्थिक चणचण लवकरच संपणार..आजचे राशीभविष्य
Horoscope Today 21 April 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 21 April 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 21 एप्रिल 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात ऍडजेस्टमेंट करावी लागेल, प्रवासाचे योग येतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीसाठी इतरांशी वादविवाद टाळावे सर्व प्रकारच्या वृत्तींना लगाम घालावा लागेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस राग गैरसमज आणि समजदारपणाच्या कक्षा रुंदवाव्या लागतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीसाठी आजचा दिवस विचारांची परिपक्वता अनुभवाने वाढवावी लागेल, जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात जाल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा मार्ग समजून घेताना, कष्टाला आपलेसे केलेत तर यश निश्चित मिळेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीसाठी आजचा दिवस प्रेमी जणांना जोडीदाराचा सहवास मिळेल, नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न असतात याचा अनुभव घ्याल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीसाठी आजचा दिवस पैशाच्या संदर्भातील अनेक कामे होऊन जातील, अनपेक्षित जुनी आणि वसूल होतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस दानधर्म करण्याचे योग येतील, थोडे हुकूमशाही वृत्तीने हाताखालच्या लोकांकडून काम करून घ्याल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीसाठी आजचा दिवस स्वभावातील लहरीपणा थोडा वाढेल, परंतु बुद्धीच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावाल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीसाठी आजचा दिवस नवीन कल्पनांचा जन्म होईल, परंतु त्याचे योग्य नियोजन केले नाही तर आकारात येणार नाही
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस महिलांनी तडजोडीचे धोरण स्वीकारावे, कोणाचाही विचार न करता आपल्या मनासारखे काम करून घेण्यास पुढे सरसावाल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीसाठी आजचा दिवस प्रकृती स्वास्थ्य चांगले राहीले तरी, पथ्य पाणी जरूर सांभाळा, तुमचा उत्साह वाखाणण्या सारखा असेल.
ही वाचा
May 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मे महिना ठरणार गेमचेंजर! 6 पैकी फक्त 3 राशी होतील मालामाल; मासिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















