Horoscope Today 20 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...


मेष (Aries Today Horoscope)


नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही सुट्टीची मज्जा घ्याल. ज्यांना कामावर जायचंय त्यांच्यावर देखील कामाचा जास्त ताण नसेल.


व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, आज रविवारमुळे तुम्ही नफ्यात असाल.


विद्यार्थी (Student) - तुमची सर्व प्रलंबित कामं लवकरच पूर्ण होतील. आज मित्रांसोबत वेळ घालवाल.


आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला अंगदुखीचा त्रास जाणवू शकतो.


वृषभ (Taurus Today Horoscope)


नोकरी (Job) - आज तुम्ही थोडं सावध राहा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज सुट्टी असली तरी तुम्हाला कामाचा ताण जाणवेल.


व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल. ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळेल.


विद्यार्थी (Student) - आज मौजमजेसोबत थोडा वेळ अभ्यासाठी दिला पाहिजे, तरच परीक्षेत चांगले गुण मिळतील.


आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं आरोग्य ठणठणीत राहील. 


मिथुन (Gemini Today Horoscope)


नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही केलेल्या कामाची तुम्हाला पोचपावती मिळेल. 


व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, किरकोळ व्यावसायिकांना देखील आज चांगला नफा मिळू शकतो.


विद्यार्थी (Student) - आज तुमच्या घरातील वातावरण चांगलं असेल, जास्तीत जास्त वेळ तुमच्या घरी घालवाल.


आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज जास्त धावपळ करू नका, दिवसाच्या शेवटी थकवा जाणवू शकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


November 2024 Astrology : नोव्हेंबरमध्ये 5 राशींचे 'अच्छे दिन' होणार सुरू; ऐन दिवाळीत मोठ्या ग्रहांचं परिवर्तन, प्रत्येक कामात मिळणार यश