Horoscope Today 20 February 2026: आज 20 फेब्रुवारीचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने धनलाभाचे योग, आजचे राशीभविष्य वाचा...
Horoscope Today 20 February 2026: आज शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 20 February 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 20 फेब्रुवारी 2026, आजचा वार शुक्रवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज व्यायामात नियमितपणा ठेवा त्याचा आरोग्यासाठी उपयोग होणार आहे, ज्यांना व्यसने आहेत, त्यांनी त्याबाबतीत धरबंद ठेवावा
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज आत्मविश्वासाला अहंकाराचा लेप दिला तर तोटा होण्याची शक्यता जास्त
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कोणतीही समस्या सोडवण्यासाठी समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवा, भावनांवर नियंत्रण ठेवून तर्कशुद्ध विचार करा
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्यास आर्थिक स्थिती सुधारेल, तरुणांचा अनावश्यक गोष्टीत बराच वेळ वाया जाईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज महिला जरा जास्तच रसिक बनतील, सर्वांशी मिळून मिसळून राहाल, त्यामुळे तुमच्याविरुद्ध बोलण्याचे धाडस कोणाचे होणार नाही
कन्या रास (Virgo Horocsope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज आपल्या मनाप्रमाणे कामे मार्गी लागतील, व्यवसायात एकापेक्षा अनेक कामे मिळतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये जे काम करायला मिळावे असा प्रयत्न करीत होतात, ते काम करण्याची संधी मिळेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज व्यवसायात एकापेक्षा अनेक कामे मिळतील, यंत्रावर काम करणाऱ्यांनी काळजी घ्यावी
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज परदेश गमनाची संधी मिळण्याची शक्यता, तुमच्याशी स्पर्धा करणारे तुमचे प्रगती पाहून माघार घेतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज कलात्मक काम करणाऱ्यांना अनेक संधी मिळतील, महिलांना आपले छंद जोपासता येतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज परिस्थिती पाहून आचरण ठेवणे आवश्यक आहे, आज तुमचा मूड जरा वेगळाच असेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज स्वभावात थोडी नाराजी अनुभवाल, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले तर चिडचिड होणार नाही.
हेही वाचा,
Shani Transit 2026: शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















