Horoscope Today 2 January 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 2 जानेवारी 2026, आजचा वार शु्क्रवार आहे. नुकतंच 2026 वर्ष सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज नववर्षाचा दुसरा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात आत्तापर्यंतचे अडथळे आले होते, ते पार करण्याचे धाडस तुम्हाला लाभेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक बाजू लगेच सुधारेल असे नाही, परंतु त्या दृष्टीने पावले टाकले जातील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज जरा जास्तच कष्ट आज घ्यावे लागतील, व्यवसायात प्रतिष्ठित व्यक्तींचे तंत्र सांभाळून काम करावे लागेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज उत्तम आकलन शक्तीमुळे तुमच्या कामात यशस्वी होणार आहात
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.. या धोरणाने काम करावे लागेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज कोणत्याही प्रकारचे व्यसनअसेलतरते सोडण्याचा प्रयत्न करा, नाहीतर नको त्या चिंता करत बसण्याची वेळ येऊ शकते
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात हाताखालचे लोक फसवण्याची शक्यता आहे, तिथे सावधानता बाळगा
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज पैशाच्या व्यवहारात तुमचे गणित बरेच वेळा चुकू शकते, म्हणून महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्लाघ्या
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज घरामध्ये एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडणे, वस्तूंची दुरुस्ती किंवा पाहुणचारयाकारणानेपैसे खर्च होतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज महिलांनी अति विचार करू नये, नोकरीमध्ये दुसऱ्याच्याहाताखालीकामकरणेमानवणारनाही
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात मनाविरुद्ध तडजोड करावीलागेल, त्याचाजरा जास्तच त्रास होईल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज जीवनासंबंधीचा एकंदरीत दृष्टिकोनबदलेल, काहीकारणामुळेभावनावशही होऊ शकता.
हेही वाचा
Shani Guru Yuti 2026: प्रतीक्षा संपली, नववर्षात 4 राशींचं भाग्यही फळफळलं! शनि-गुरूचा पॉवरफुल संयोग, दुप्पट वेगाने प्रगती, पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
