Horoscope Today 19 May 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 19 मे 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. बाप्पाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
महिला प्रभुत्व गाजवतील, पैसा आला तरी खर्चाला मर्यादा राहणार नाही
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
छोटे-मोठे प्रवासाचे योग येतील, सहलीला जाण्याचे बेत ठरवाल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
अचानक एखादे जुने येणे वसूल होण्याची शक्यता आहे, एखाद्या दुर्मिळ संधीबद्दल उगीचच उदासीनपणा दाखवाल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
जेवढे दिलखुलासपणे एखाद्या गोष्टीचा आस्वाद घ्याल, तेवढी शांती आणि समाधान लाभेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन त्याप्रमाणे वागणूक ठेवावी, नोकरीमध्ये अधिकाऱ्याच्या गैरवापर करण्याचा मोह होईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
मुलांना चार उपदेशाचे शब्द सांगावेसे वाटते, कधी कधी निराश होण्याचे प्रसंग ही येतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
हितचिंतकांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे तुम्हाला उत्साह येईल, समारंभाच्या निमित्ताने आप्तेष्टांच्या भेटी गाठी होतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
प्रकृतिमान सांभाळून आणि ओळखून त्याप्रमाणे पथ्य पाणी सांभाळावे
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
महिलांना मनाप्रमाणे कामे करून घेण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
तुमच्या स्वभावातील कोरडेपणा कधी कधी जवळच्या लोकांना फारच खटकेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कोणतीही परवा न करता स्वतःच्या मस्त धुंदीत दिवस घालवाल
मीन रास (Pisces Horoscope Today)
नोकरीमध्ये वरिष्ठांची हांजी न करता पटलं तर हो, नाहीतर माझा राजीनामा या अविर्भावात वागणूक ठेवाल.
हेही वाचा
