एक्स्प्लोर

Horoscope Today 19 April 2026 : आज अक्षय्य तृतीयेनिमित्त 5 राशींना होणार धनलाभ, देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात येणार सोनं-चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 19 April 2026 : आज ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे.

Horoscope Today 19 April 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 19 एप्रिल 2026 चा दिवस आहे. आज रविवारचा दिवस आहे. मात्र, आजचा दिवस फार शुभ असमार आहे. कारण आजच्या दिवशी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला आजचा हा दिवस हिंदू धर्मात पार महत्त्वाचा मानला जातो. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण आज अनेक राजयोगांसह महत्त्वाच्या ग्रहांचं देखील संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमच्यावर धनवर्षाव होण्याची शक्यता आहे. मात्र, तुमच्या खर्चातही वाढ झालेली दिसेल. खाण्या-पिण्याची वेळीच काळजी घ्या. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तसेच, आजच्या दिवसात तुमच्या हातून शुभकार्य घडण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

आर्थिक दृष्टीकोनातून तुमचा आजचा दिवस लाभदायी असणार आहे. नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. तसेच, तुमच्या हातात काही चांगले प्रोजेक्ट्स येऊ शकतात. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तुम्ही जे कार्य कराल त्यात पार्टनरचा सहभाग तुमच्यासाठी मोलाचा ठरेल. आज एखादी महत्त्वाची माहिती तुमच्या हातात लागेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस समस्यांतून मोकळं होणारा आहे. गेले अनेक दिवस तुमच्या आयुष्यात जे वादळ सुरु होतं ते वादळ आज शमण्याची वेळ आली आहे. तुमच्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी बदलताना दिसतील. अनेक सकारात्मक गोष्टी घडतील. विचारसरणीत बदल जाणवेल. तसेच, तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही अधिक लक्षपूर्वक काम कराल.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला ना लाभ ना तोटा होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाकडून तुमच्या फारशा अपेक्षा नसतील. मात्र, तुम्ही जे काम करताय ते प्रामाणिकपणे करत राहा. अन्यथा तुमचे विरोधक तुमच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तुमची एक चूक तुमचं भविष्य ठरवू शकते. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेलच असे नाही. त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासाने आणि  मेहनतीने काम करा. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज तुमच्या भूतकाळातील काही गोष्टी तुमच्या आयुष्यात डोकावू शकतात. अशा वेळी त्यांना कितपत स्थान देणं हे तुमच्या हातात आहे. तसेच, जर तुमच्या हातून एखादी चूक घडली असेल तर त्याची कबूली आजच द्या अन्यथा हातून वेळ निघून जाईल. आज एखाद्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात करु नका. समस्या येण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करु शकता. कामाच्या निमित्ताने तुम्ही आज प्रवास कराल. मुलांच्या देखील कलागुणांचा विकास झालेला दिसेल. आज दिवसभरात तुम्हाला एखादी आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धैर्य आणि संयमाचा असणार आहे. तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडू शकतात. त्यामुळे वेळीच सावध राहा. आज कोणतीही महत्त्वाची जोखीम हाती घेऊ नका. तसेच, घरगुती कामांमध्ये तुमचा सहभाग दाखवा. आजच्या दिवसात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. तुमच्या अंगाशी येऊ शकतो. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी देखील आजचा दिवस व्यस्ततेचा तसेच सावधानतेचा असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कामाचा ताण वाढलेला दिसेल. अशा वेळी जास्त ताण घेऊ नका. तसेच, वेळेवर जोप घ्या. आज वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या बाबतीत आश्चर्यकारक घटना घडू शकते.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस मिश्रीत स्वरुपाचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या एका कामाच्या संदर्भात सतत चिंता वाटेल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामात देखील तुमचं लक्ष लागणार नाही. याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो. तसेच, शेअर मार्केटच्या संदर्भात तुमचे शेअर्स कोसळण्याची शक्यता आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमचं एखादी सरकारी योजनेचं काम पूर्ण होईल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला लवकरच परदेशात जाण्याची संधीदेखील मिळेल. आज काही जवळच्या नातेवाईकांशी तुमच्या भेटीगाठी होऊ शकतात. काही नवीन प्रोजेक्ट्स हाती लागतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज तुमची काही रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, मित्रांच्या सहयोगाने तुम्हाला अनेक कामे पूर्ण करता येतील. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Akshaya Tritiya 2026 Wishes : अक्षय्य तृतीयेनिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठमोळ्या शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस PHOTOS

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस..5 राशींच्या संपत्तीचा वेग डबल, पैसा दुप्पट! पॉवरफुल गजलक्ष्मी राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, प्रेम फर्स्ट क्लास...कोण मालामाल?
पुढचे 7 दिवस..5 राशींच्या संपत्तीचा वेग डबल, पैसा दुप्पट! पॉवरफुल गजलक्ष्मी राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, प्रेम फर्स्ट क्लास...कोण मालामाल?
Shani Jayanti 2026: प्रतीक्षा संपली! आज शनि जयंतीला जबरदस्त महायोगायोग, 3 राशींना बंपर लाभ, 2 राशींवर संकटाचं वादळ? शनिचा गेम सांगतो...
प्रतीक्षा संपली! आज शनि जयंतीला जबरदस्त महायोगायोग, 3 राशींना बंपर लाभ, 2 राशींवर संकटाचं वादळ? शनिचा मोठा गेम काय?
Horoscope Today 16 May 2026: आज शनि अमावस्येचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिकृपेने साडेसाती, कष्टातून सुटका, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज शनि अमावस्येचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिकृपेने साडेसाती, कष्टातून सुटका, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Shani Jayanti 2026: साडेसाती, ढैय्या पेक्षा मोठी सत्त्वपरीक्षा...शनि महादशेचा 19 वर्षांचा अत्यंत कठीण काळ! सध्या 'या' राशींवर प्रभाव, कमी लोकांना माहित...
साडेसाती, ढैय्या पेक्षा मोठी सत्त्वपरीक्षा...शनि महादशेचा 19 वर्षांचा अत्यंत कठीण काळ! सध्या 'या' राशींवर प्रभाव, कमी लोकांना माहित...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report
Sanjay Raut Statement : तरुणांचा अपमान,राऊतांविरोधात घमासान, एक्स पोस्ट वादाच्या चर्चेत Special Report
Pune Hospital Bomb : गुप्तरोग, बॉम्ब आणि सेलो टेप, ऑनलाईन पेमेंटमुळे कसा झाला भांडफोड Special Report
Petrol Price Hike : इंधनाचा भडका, महागाईचा तडका,खिशाला कात्री Special Report
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Exam paper leak: नीट परीक्षा रद्द झाल्याचा धसका, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
नीट परीक्षा रद्द झाल्याचा धक्का सहन झाला नाही, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
Petrol Tax : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Live blog updates: नाशिकच्या पंचवटी परिसरातील ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न
Maharashtra Live blog updates: नाशिकच्या पंचवटी परिसरातील ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न
LSG vs CSK : लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
Mitchell Marsh : मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
MAHATET : नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार, महाटीईटीच्या तारखेत बदल, महाराष्ट्र  राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
महाटीईटीच्या तारखेत नीट परीक्षेमुळं बदल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
Tata : टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर
टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर
Embed widget