Horoscope Today 19 April 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 19 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार शनिवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीदत्त आणि शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आज वडिलोपार्जित इस्टेटसंबंधी वाद टोकाला जाऊ शकतात, अचानक खर्च समोर आल्यामुळे थोडी धांदल उडेल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज पैशाची जमवाजमा करण्यासाठी जास्त कष्ट पडतील, कर्ज-रक्कम आज न घेतलेली बरी 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज आर्थिक मोहाच्या क्षणांपासून सावधानता वाळवा, नाहीतर पुढे होत्या येण्याची शक्यता आहे,

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज कोर्ट दरबारी संघर्ष जास्त वाढतील, मानापमानाच्या कल्पनांमुळे हातातील संधीचा फायदा करून घेणार नाही  

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज खाण्यापिण्यावर बंधन ठेवले नाही, तर पोटाचा आजार अपचन होण्याची शक्यता आहे  

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांच्या अभ्यासामागे जास्त कष्ट घ्यावे लागतील, त्यांच्यामागे दिवस जाईल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज महिलांना घरगुती बाबतीत तडजड करावी लागेल, आज इच्छाशक्ती चांगली ठेवा, यश मिळेल  

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज राहती जागा बदलायची असेल, तर अवश्य प्रयत्न करावेत, काही भाग्यकारक घटना घडतील 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील, अति भावनाप्रधानतेमुळे नुकसान होईल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज भावंडांनी दिलेल्या सर्व प्रस्तावाला मान्यता दिलीच पाहिजे असे नाही, स्वतःच्या मनाचा कौल सर्वात महत्त्वाचा ठरेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती सुधारेल, वडिलांची थोडे मतभेद संभवतात

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज घरात एखादी मंगल कार्य ठरेल, नातेवाईकांच्या सहवासात काय उत्तम जाईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)