Horoscope Today 18 September 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 18 सप्टेंबर 2025 चा दिवस आहे. म्हणजेच आजचा दिवस गुरुवार आहे. आजचा दिवस हा दत्तगुरुंना समर्पित आहे. आजच्या दिवशी दत्तगुरुंची पूजा केली जाते. आज अनेक ग्रहांचं संक्रमण देखील आहे. तसेच, लवकरच सूर्यग्रहण देखील आहे. त्यानुसार, 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope) :
आज ऊर्जा आणि आत्मविश्वास उच्च असेल. नवे प्रकल्प सुरु करण्यास चांगला दिवस आहे. आर्थिक लाभाची शक्यता. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ रास (Taurus Horoscope) :
कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण राहील. महत्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा. खर्चांवर नियंत्रण ठेवा. मानसिक आरोग्य सांभाळा.
मिथुन रास (Gemini Horoscope) :
मित्रमंडळीत चांगला वेळ जाईल. व्यवसायात प्रगती व नवी संधी. प्रवास योग आहे. मन प्रसन्न राहील.
कर्क रास (Cancer Horoscope) :
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. कामात आव्हाने असू शकतात पण संयमाने पार कराल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह रास (Leo Horoscope) :
आज सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. आत्मविश्वासाने निर्णय घ्या. आर्थिक लाभ संभवतो. नवी ओळख उपयोगी पडेल.
कन्या रास (Virgo Horoscope) :
आरोग्याची विशेष काळजी घ्या. मेहनतीचे फळ मिळेल. ताण टाळण्यासाठी विश्रांती घ्या. आर्थिक व्यवहारात दक्षता आवश्यक.
तूळ रास (Libra Horoscope) :
कुटुंबीयांसोबत आनंदी क्षण घालवाल. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope) :
गुप्त शत्रूंपासून सावध रहा. मानसिक स्थैर्य ठेवा. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल.
धनु रास (Sagittarius Horoscope) :
प्रवासातून लाभ होईल. नवे प्रकल्प यशस्वी होतील. आरोग्य चांगले राहील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
मकर रास (Capricorn Horoscope) :
कामाचा ताण वाढू शकतो. आर्थिक व्यवहारांत संयम आवश्यक. सहकाऱ्यांचा सहयोग लाभेल. कुटुंबातील वातावरण शांत राहील.
कुंभ रास (Aquarius Horoscope) :
मानसिक शांती टिकवा. नवीन ओळखी जुळतील. निर्णय विचारपूर्वक घ्या. घरात आनंदाचे वातावरण राहील.
मीन रास (Pisces Horoscope) :
शुभ दिवस आहे. नवी संधी मिळतील. सर्जनशील कामात यश मिळेल. आरोग्य व मन प्रसन्न राहील.
- समृद्धी दाऊलकर
हे ही वाचा :