Horoscope Today 18 May 2024 : पंचांगानुसार, आज 18 मे 2024, शनिवारचा दिवस. आजचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी फायद्याचा तर काही राशींच्या लोकांसाठी तोट्याचा असणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
तुमच्याकडे असलेली निरीक्षण शक्ती पणाला लावण्याचा प्रयत्न करा. आपल्या आवडत्या गोष्टींचा सखोल अभ्यास चांगल्या पद्धतीने कराल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
नोकरीमध्ये कोणत्याही कामासंदर्भात दोन पर्याय डोळ्यांसमोर असतील त्यामधून एक पर्याय निवडावा लागेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मनाची द्विधा अवस्था कृतीवर परिणाम करणारी ठरेल. तेव्हा तुमचे अंतर्मन काय सांगते आहे त्याचा विचार करा आणि निर्णय घ्या.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
अति तेथे माती हे लक्षात ठेवून आवश्यक तेथे मनाला आवर घालावा लागेल. पूर्वी केलेली आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
अंथरूण पाहून पाय पसरा असा ग्रहांचा संदेश आहे थोडे अस्वस्थ राहाल. आणि निर्णय ठामपणे घेणार नाही.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आज तुमच्या बुद्धीच्या जोरावर वेळ मारून नेणार आहात. संततीसाठी काही कारणासाठी पैसा खर्च करावा लागेल.
तुळ रास (Libra Horoscope Today)
मुलांना तुमची मते न पटल्यामुळे घरात थोडे तणावाचे वातावरण राहील. थोडक्या कारणावरून चिडचिड होऊ शकते.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
थोडेसे हट्टी आणि हेकट बनाल यासाठी चित्त शांत ठेवणे आवश्यक आहे. महिलांना मानसिक अस्थिरता जाणवेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आज प्रकृती सांभाळा. जुन्या आजारांना तोंड द्यावे लागेल. वाहने जपून चालवावीत.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
शब्द हे शस्त्र आहे हे लक्षात ठेवून बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात पार्टनरशिप पटवून घ्यावे लागेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
तुमच्यातील चांगुलपणाला लोक दाद देतील. वाईट यातून चांगले घेण्याची गुणग्राहकता ठेवाल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
नोकरी व्यवसायात काही भरीव बदल करायचे मनात येतील. त्या दृष्टीने पावले उचलाल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: