Horoscope Today 18 February 2026: आज फाल्गुन मासारंभ 7 राशींसाठी भाग्यशाली! लक्ष्मीनारायणाच्या कृपेने आर्थिक चणचण संपेल, आजचे राशीभविष्य वाचा...
Horoscope Today 18 February 2026: आज बुधवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 17 February 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 18 फेब्रुवारी 2026, आजचा वार बुधवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज फाल्गुन महिन्याची सुरूवात झाली असल्याने आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे मानसिक समाधान मिळेल, पुढे आलेल्या संधीचे सोने करणे तुमच्या हातात आहे
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज व्यवसाय फायदा होण्याकडे माप झुकेल, नोकरीमध्ये आनंदी वातावरणामुळे कामाचा वेग वाढेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कलाकारांनी खेळाडूंना पूर्वी न मिळालेली संधी चालून येईल, बाजारातील परिस्थिती बघून गुंतवणूक करा
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज व्यवसायात थोडीफार वसुली झाल्यामुळे गरजे इतके पैसे हातात पडतील, घरातील व्यक्तींबरोबर प्रवासी योग दर्शवतात
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज संततीच्या विचारांची बरोबरी तुम्ही करू न शकल्यामुळे मतांमध्ये भिन्नता निर्माण होईल, मनावर ताण उत्पन्न होईल
कन्या रास (Virgo Horocsope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज वैवाहिक जीवनात संघर्ष आणि अशांतता निर्माण करणारा दिवस, महिला घरामध्ये जास्त रमतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज तरुण वर्गाला प्रेम प्रकरणांमध्ये अडथळे येण्याची शक्यता, त्यांनी वरच्या रंगावर न बोलता व्यक्तीच्या स्वभावाचा खोलवर अंदाज घेणे गरजेचे ठरेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या क्षेत्रामध्ये आपल्या बुद्धीची चमक दाखवू शकाल, कलाकारांना आपल्या कलेचा शुद्ध आविष्कार दाखवण्यात यश मिळेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांनी इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा अभ्यासात जास्त लक्ष दिले तर ध्येयापर्यंत पोहोचू शकतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज मोठ्या भावांनांच्या विचित्र वागणुकीचा त्रास होईल, व्यापारी वर्गाला काही गोष्टींचे आकलन न झाल्यामुळे निर्णय घेणे कठीण जाईल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अरेरावीला तोंड द्यावे लागेल, परंतु घरातील वातावरण हलकेफुलके राहिल्यामुळे स्वास्थ लाभेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज महिलांना काही निर्णय घेणे कठीण जाईल, एखादी गोष्ट करायची नसेल तर, त्याचे पडसाद बाहेर न दाखवता परिस्थिती व्यवस्थित हाताळण्यात यशस्वी होणार आहात.
हेही वाचा,
Shani Ast 2026: मार्चमध्ये 4 राशींना धक्का, 40 दिवस कठीण काळ! शनिचा अस्त, नशीबही मावळणार? कोणत्या राशींना सावध राहावे लागेल?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















