Horoscope Today 17 March 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 17 मार्च 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान हनुमानाच्या (Lord Hanuman)कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today)जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

जवळच्या लोकांना आवश्यक ती मदत करण्याची वृत्ती राहील फक्त ऊस गोड लागला म्हणून मुळासकट कोणी खात नाही ना याची सावधानता बाळगा.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वेगवेगळ्या क्षेत्रातील कारागिरांच्या नवीन कल्पनांना पोषक वातावरण मिळेल महिलांना कामाच्या बाबतीत तारेवरची कसरत करावी लागेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल शांत बसून विचार करणे गरजेचे आहे शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचे ठरेल.  

कर्क रास (Cancer Horoscope Today)

करिअरमध्ये आपण जे काम करतो त्या कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक ठरेल.  

सिंह रास (Leo Horoscope Today)

अति महत्त्वाकांक्षा किंवा चंचल स्वभावामुळे कामात अडथळे येतील समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून न घेतल्यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

काहीतरी जगा वेगळी करायला जाल परंतु ते अंगलट येणार नाही याची काळजी घ्या. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

धार्मिक किंवा सामाजिक कार्यात नावीन्यपूर्ण गोष्टी कराल महिलांची चार चव्हाण पेक्षा काहीतरी वेगळे करण्याची वृत्ती वाढेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

घरामध्ये ज्येष्ठ आणि तरुण दोन्ही वर्गांची येजा वाढणार आहे त्यामुळे जुन्या आणि नवीन विचारांची साथ तुम्हाला द्यावी लागेल. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

घरातील अनेक कामांच्या मदतीसाठी जोडीदाराचे सहकार्य मिळवावे लागेल काम लवकर पूर्ण होण्यासाठी वेगळी पद्धत अवलंबावी लागेल. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

बोलण्यापेक्षा मौन पाळणे कधी कधी फायद्याचे ठरते हा अनुभव घेणार आहात स्वतःची कामे स्वतः केली तर फायदेशीर ठरतील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

जुनी आणि वसूल होतील अशावेळी केलेल्या उत्तम आर्थिक नियोजन फायद्याचे ठरेल. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

भावाने बरोबरच व्यवहारालाही उत्तम महत्व द्याल घरामध्ये दुरुस्तीची कामे निघतील.

हे ही वाचा : 

Chaturgrahi Yog 2026 : कुंभ राशीत 4 ग्रहांची युती! आज संध्याकाळपासूनच ‘या’ 3 राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ, मिळणार मोठ्ठा लाभ