Horoscope Today 17 June 2024 : पंचांगानुसार, आज 17 जून 2024, आठवड्यातला पहिला सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


हाता तोंडाशी आलेल्या पैशाच्या संधी थोडक्याने हुकतील. परदेश प्रवासाचे योग येतील.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


नोकरीमध्ये बदली होण्याची शक्यता आहे. एकंदरीत दिवस आनंदी जाईल. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


अनेक प्रकारच्या लोकांच्या संपर्कात याल. त्याचा फायदा तुमचा धोरणी आणि दूरदर्शी स्वभाव नक्कीच घेणार आहे.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता होईल. त्यामुळे आवश्यक ती कामे मार्गी लागतील. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


तुमची बुद्धिमत्ता आणि ग्रहण शक्ती याच्या जोरावर कामाचा दर्जा चांगला ठेवाल. महिला बौद्धिक क्षेत्रात जास्त रमतील. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


तुमचे अंतर्मन काय साथ घालते आहे याचा अंदाज जवळचे लोक निश्चित घेतील. नाजूक पण तेवढ्याच चिवट मनाने कामे मार्गी लावाल.


तुळ रास (Libra Horoscope Today)


धाडसी निर्णय घ्यायला अजिबात मागेपुढे पाहणार नाही. तुम्ही केलेले काम आणि तुम्हाला मिळणारा मोबदला याचे गणित उत्तम जमेल.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


कर्तव्याला राहिलेले कष्ट त्यामानाने जास्त असतील तरीसुद्धा एक वेगळाच आत्मविश्वास बाळगाल. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


कामासाठी तत्परता दाखवाल. वडिलोपार्जित इस्टेटी चा प्रश्न मात्र रेंगाळत पडेल.


मकर रास (Capricorn Horoscope Today)


दुसऱ्यांना सतत मदतीचा हात देत असल्यामुळे लोकप्रिय राहाल. महिलांना जरा जास्तच कष्ट पडतील. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


घरामध्ये आनंदी वातावरण राहील त्यामुळे घरात जास्त रमाल. चैनीत दिवस घालवाल.


मीन रास (Pisces Horoscope Today)


व्यवसायात कामाकडे जरा जास्तच दुर्लक्ष होईल. त्यामुळे लाभही कमी मिळेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या