Horoscope Today 16 October 2026: आज नवरात्रीचा सहावा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Horoscope Today 16 October 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 16 ऑक्टोबर 2026 शुक्रवार, हा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? आजचा दिवस कोणासाठी फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 16 October 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 16 ऑक्टोबर 2026, आज शुक्रवारचा दिवस अत्यंत खास आहे, आज नवरात्रौत्सवाचा सहावा दिवस आहे. आज शुक्रवार असल्याने हा दिवस देवी लक्ष्मी आणि देवी पार्वतीला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस तुम्ही जेथे काम करता तेथे अचानक काही बदल संभवतात, अशावेळी तुमच्याशिवाय त्यांचे काही चालणार नाही
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस महिलांनी त्यांना अवगत असलेल्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा, आर्थिक गोष्टींमध्ये थोडी अनिश्चितता दाखवते
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस मित्रमंडळींशी भांडणाचे प्रसंग उद्भवतील, घरात आणि बाहेर तुमच्याकडून एक प्रकारची व्यावहारिक बैठक घातलेली तुम्हाला जाणवेल
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस भावना गुंडाळून ठेवून कठोर निर्णय घ्याल, तुमच्या स्वभावात थोडा हट्टीपणा असल्यामुळे दुसऱ्याला स्वातंत्र्य देताना हात थोडा आकडताच घ्याल
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस स्वतःचा विचार जरा जास्तच कराल, सतत काहीतरी नवीन शिकण्याची धडपड चालू राहील
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस जोडीदाराची वादविवाद संभवतात, कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरेल
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस तुमची मते घरातील लोकांना न पटल्यामुळे वाद होतील, थोडा ताण वाढेल आणि मानसिक स्वास्थ्य गमावून बसाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस आहे त्या गोष्टींमध्ये समाधान मानून घ्यावे लागेल, महिलांनी भावना प्रगट करताना संयम राखावा
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस तुमच्या वागण्या बोलण्यात संघर्षाचा प्रतिकराचा भाग जास्त असेल, दुसऱ्याच्या मताशी लवकर सहमत होणार नाही
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस भावंडांशी थोडे वाद संभवतात, व्यापार धंद्यात सतत काहीतरी उलाढाल करण्यात गुंतून जाल
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस काही गोष्टी गुप्त ठेवण्याकडे कल राहील, कानाचा त्रास असणाऱ्यांनी डॉक्टरी उपचार वेळेवर घ्यावेत
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस घरगुती कारणासाठी मनाविरुद्ध लहान मोठे प्रवास करावे लागतील, आपल्या विचारांशी पक्के राहाल, त्यामुळे समोरच्या लोकांना तुम्ही हटवादीही वाटाल.
हेही वाचा :
Shardiya Navratri 2026: पंचमी, अष्टमी कि नवमी..नवरात्रीत देवी, कुलदेवीची ओटी कधी भरावी? घरी कि मंदिरात भरावी? 'या' एका गोष्टीशिवाय ओटी अपूर्ण! धार्मिक मान्यता...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा कवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















