Horoscope Today 16 October 2024 : पंचांगानुसार, आज 16 ऑक्टोबर 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


व्यापारात आर्थिक प्रमाण वाढवण्यासाठी भरपूर मेहनत घेण्याची तयारी दर्शवाल.


वृषभ (Taurus Horoscope Today)


आज तुम्ही केलेल्या कामाला चांगला प्रतिसाद मिळेल. महिला थोड्या चाकोरी बाहेर वागतील. 


मिथुन (Gemini Horoscope Today)


आज लोक तुमच्या नादी लागणे टाळतील. तुमच्या नवीन भन्नाट कल्पना लोकांच्या पचनी लवकर न पडल्यामुळे थोडी आग्रही भूमिका ठेवाल.


कर्क (Cancer Horoscope Today)


विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त राहतील. महिलांचा तापटपणा वाढेल.


सिंह (Leo Horoscope Today)


नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मताच्या विरुद्ध वागण्याचे बंड पुकाराल.


कन्या (Virgo Horoscope Today)


शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष संधी मिळतील.


तूळ (Libra Horoscope Today)


कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


व्यापारात काहीतरी नाविन्यपूर्ण कामे करण्याचा इरादा बाळगाल.


धनु (Sagittarius Horoscope Today)


तुमचे यश तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून राहणार असल्यामुळे विचाराची लक्ष्मण रेषा ओलांडू नका.


मकर (Capricorn Horoscope Today)


तुमच्या यशाचे शिल्पकार तुम्हीच आहात हा आत्मविश्वास कायम ठेवा काम होईल.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


आज कोणत्याही समस्येला पाठीवर घेण्याची ताकद तुमच्यामध्ये राहील.


मीन (Pisces Horoscope Today)


तरुण वर्गात नवीन ओळखी होतील आणि त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय; होईल आर्थिक भरभराट, उत्तम आरोग्य लाभेल