Horoscope Today 16 May 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 16 मे 2026, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज शनि अमावस्येचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज अनेक शुभ ज्योतिषीय योगायोग जुळून येत आहेत. आजच्या दिवसाचा सर्व राशींवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडेल. त्यामुळे शनिदेव कृपेने सर्व 12 राशींच्या लोकांसाठी तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस कितीही कष्ट पडले तरी हसरा मुखवटा घेऊन हिंडावे लागेल, उत्साही स्वभावाला थोडी वेसणही घालावी लागेल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस समस्या येतील पण त्या संधी आहेत असे समजून काम करा, तुमच्या सोशल वागणुकीचा फायदा होईल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीसाठी आज नोकरीमध्ये वरिष्ठांना आपण बरोबर कसे आहोत, हे सिद्ध करून दाखवावे लागेल मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीसाठी आजचा दिवस कामामध्ये विलंब झाला तरी समोरचे धोरण स्वीकारण्यातच तुमचा मोठेपणा आहे, संतती बाबत चिंता निर्माण होऊ शकतात 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस महिलांनी इतरांना कमी लेखू नये, थोडी अस्थिरता निर्माण झाल्यामुळे निर्णय घेण्यात कमी पडाल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीसाठी आजचा दिवस हाती आलेल्या संधी निघून जाऊ शकतात, अशावेळी त्या विषयातील तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन कामे मार्गी लावा 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीसाठी आजचा दिवस तुमच्या डोक्यातही नसेल, अशी एखादी फायद्याची गोष्ट घर चालत तुमच्याकडे येईल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस अचानक प्रवासाचे योग येतील, घराबाहेर राहण्याचे प्रसंग वरचेवर येतील 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीसाठी आजचा दिवस घरातील लोकांबरोबर खटके उडण्याची शक्यता, जोडीदाराच्या लहरी स्वभावाचा त्रास होईल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस आज सामंजस्याचे धोरण स्वीकारावे लागेल, महिलांना स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याची संधी मिळू शकते 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस तुमच्या बौद्धिकते मुळे त्याचे फायदे तोटे सहन करावी लागतील, एखाद्या गोष्टीचा सुवर्ण मध्य काढावा लागेल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीसाठी आजचा दिवस आर्थिक घडी चांगली बसेल, त्यामुळे थोडं हलकं वाटेल, महिलांना करिअरमध्ये संधी मिळतील

हेही वाचा

Shani Jayanti 2026: साडेसातीतून सुटका! 16 मे रोजी शनिदेव इन एक्शन मोड! 4 राशींच्या भाग्याचं कुलुप उघडणार, 13 वर्षांनी दुर्मिळ योगायोग...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)