Horoscope Today 16 February 2026: आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली! भोलेनाथांच्या कृपेने विघ्न, संकट टळणार, आजचे राशीभविष्य वाचा...
Horoscope Today 16 February 2026: आज सोमवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 16 February 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 16 फेब्रुवारी 2026, आजचा वार सोमवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात नोकरदार यशस्वी होतील, घरात वाद विवाद निर्माण झाले तरी तडजोडीचे धोरण स्वीकारा
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज जोडीदाराला समजावून घ्या, दिवस सुखी आणि संपन्न करण्यासाठी खूप कष्ट घ्याल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज रसिकता असल्यामुळे काहीतरी नवीन चांगली गोष्ट करण्याकडे सतत कल राहील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज महिलांच्या बाबतीत आनंददायी घटना घडतील, नेत्रविकाराबाबत वेळीच औषधोपचार घेणे आवश्यक राहील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज वडिलोपार्जित स्टेटस संबंधी वाद टोकाला जातील, त्यासाठी समझोता करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरेल
कन्या रास (Virgo Horocsope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज अचानक खर्च समोर आल्यामुळे थोडी धांदल उडेल, पैशाची जमवाजमव करण्यासाठी जास्त कष्ट पडतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज कर्जाऊ रक्कम आज न घेतलेली बरी, आर्थिक मोहाच्या क्षणांपासून सावधानता बाळगा
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कोर्ट दरबारी संघर्ष जास्त वाढतील, मानापमानाच्या कल्पनांमुळे हातातील संधीचा फायदा करून घेणार नाही
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज खाण्यापिण्यावर बंधन ठेवले नाही तर, पोटाचा आजार, अपचन होण्याची शक्यता आहे
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतील, महिलांना घरगुती बाबतीत तडजोड करावी लागेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कोणत्याही यशाचा गमक तुमच्या इच्छाशक्तीतच आहे, हे लक्षात ठेवले तर यश मिळेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज काही भाग्यकारक घटना घडतील. फक्त कोणाकडे वाच्यता करू नये.
हेही वाचा
Weekly Lucky Zodiac Signs: पैसा चुंबकासारखा, 5 राशींचं नशीब जोरात! फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात धन-बुधादित्य राजयोगानं लागणार लॉटरी, साप्ताहिक भाग्यशाली राशी..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















