एक्स्प्लोर

Horoscope Today 15 February 2026 : आज महाशिवरात्रीच्या दिवशी 7 राशींना मिळणार महादेवाचा संकेत; संध्याकाळच्या वेळी फक्त 'हे' कार्य टाळा, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 15 February 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 15 February 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 15 फेब्रुवारी 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार रविवार आहे. हा दिवस  आपण सूर्यदेवाला समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी महाशिवरात्री (Mahashivratri 2026) देखील आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. आजच्या दिवशी भक्त महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात. पूजा करतात. तसेच, इच्छित फळ मागतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. महादेवाच्या कृपेने तुमच्यासमोर आलेलं विघ्न लवकर टळेल. तसेच, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. फक्त तुमच्या प्रयत्नांत सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. त्यासाठी प्रयत्नशील राहा. संध्याकाळच्या वेळी गणेश मंदिरात जाऊन पूजा करणं शुभकारक ठरेल.  

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, वैवाहिक जीवनातही गोडवा टिकून राहील. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज दिवसभर तुम्हाला एखादी गोष्ट मनात सलत राहील. त्याची चिंता वाटेल. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभकारक नाही. संध्याकाळच्या वेळी महादेवाच्या मंदिरात जाणं लाभदायी ठरेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जे तरुण लग्नाचे आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील जुने वाद आज मिटतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक ठरु शकतो. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला दिर्घकालीन आजार पुन्हा त्रास देऊ शकतो. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी बॉसचा ओरडा मिळण्याची शक्यता आहे. यासाठी आपले काम प्रामाणिकपणे करत राहा. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीचा आजचा दिवस अध्ययनात जाईल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. तसेच, शेअर बाजारात तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. सकारात्मक गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडताना दिसतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज व्यापारी वर्गातील लोक आपल्या कामातून चांगला नफा मिळवू शकतात. तुमचे वैवाहिक जीवनदेखील चांगले असणार आहे. आज तुमची महत्वाची कामे वेळेत पूर्ण करता येतील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस साहस आणि परिश्रमाचा असणार आहे. आज तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी तडजोड करावी लागेल. यामुळे तुम्ही निराश होऊ शकता. एखादं काम पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड देखील होऊ शकते. मात्र, रागाच्या भरात कोणाला काहीही बोलू नका. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा असणार आहे. आज दिवसभरात तुम्हाला तणाव तसेच थकवा जाणवू शकतो. मनात खूप काही गोष्टी साठून आहेत. अशा वेळी योग्य मित्र-मैत्रीणीजवळ ते शेअर करा. अन्यथा त्या गोष्टी तुमच्या मनात राहतील. कामात मन रमणार नाही. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, तुमच्या घरात आनंदी वातावरण राहील. आज विविध स्त्रोतांमधून तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. आरोग्य एकदम उत्तम राहील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असू शकतो. तुमच्या महत्त्वाच्या कामात दिरंगाई आल्यामुळे तुमचं मन नाराज होऊ शकतं. तसेच, हातातून पैसाही जाण्याची शक्यता आहे. अशा वेळ धैर्याने काम करा. तुम्ही जे काम करताय त्यात विश्वास आणि सातत्य असणं गरजेचं आहे

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जर तुम्हाला एखादी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही बाप्पाच्या आशार्वादाने त्याची सुरुवात करु शकता. भविष्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, मित्र-मैत्रीणींचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Mahashivratri Wishes 2026 : नमो नमो जी शंंकरा...! महाशिवरात्रीच्या आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना द्या मराठमोळ्या शुभेच्छा; पाठवा 'हे' खास मेसेजेस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्यापासून 4 राशींच्या आयुष्यात सुखाची एंट्री! हांचा पॉवरफुल केंद्र दृष्टी योग, लक्ष्मी-कुबेर प्रसन्न, धनलाभाचे योग
गुढीपाडव्यापासून 4 राशींच्या आयुष्यात सुखाची एंट्री! हांचा पॉवरफुल केंद्र दृष्टी योग, लक्ष्मी-कुबेर प्रसन्न, धनलाभाचे योग
Shani Ast 2026: पुढच्या 48 तासांत शनिदेव इन एक्शन मोड! 4 राशींच्या आयुष्यात चमत्कार, शनिचा अस्त, कोणत्या राशी मालामाल? कोण सावध? 
पुढच्या 48 तासांत शनिदेव इन एक्शन मोड! 4 राशींच्या आयुष्यात चमत्कार, शनिचा अस्त, कोणत्या राशी मालामाल? कोण सावध? 
Horoscope Today 10 March 2026 : आज मंगळवारचा दिवस 7 राशींवर पडणार भारी, दिवसाच्या शेवटी घडणार आक्रीत; वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 7 राशींवर पडणार भारी, दिवसाच्या शेवटी घडणार आक्रीत; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 10 March 2026 : आज मंगळवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! बजरंगबलीच्या कृपेने विघ्न होणार दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! बजरंगबलीच्या कृपेने विघ्न होणार दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Embed widget