Horoscope Today 14 May 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 14 मे 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीविठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आज आपल्यापेक्षा लहान मुलांच्या वयामध्ये रमून जाल, नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांची मर्जी राहील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज तुम्ही बोलाल त्याची इतरांवर छाप पडेल फक्त दुसऱ्यांना लागेल असे बोलू नका नाहीतर गैरसमज होतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांनी अविचाराने वागू नये मुलांच्या प्रगतीचा आलेख उंचावल्यामुळे मानसिक समाधान लाभेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज स्थावर इस्टेटची कामे पूर्ण होतील, तुमच्या सरळ मार्गे विचारांमुळे भविष्यात लाभ मिळेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसाय नवीन संधी आणि त्याबरोबर भरपूर कष्ट करण्याची तयारी ठेवण्याचा संदेश ग्रह देत आहेत
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज नित्य बदलत्या आयुष्याचे स्वागत करणे हा तुमचा स्वभाव आहे, त्यामुळे तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांचा प्रवास अतिशय आत्मविश्वासाने कराल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज जरुरीपेक्षा जास्त विचार करणे टाळले, तर अनेक क्षेत्रात मग विविध संधी मिळतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जीवाचे रान करण्याची ताकद ग्रह तुम्हाला देणार आहेत, फक्त तेथे विचार नको
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज भावंडांशी थोडे मतभेद संभवतात, वरचेवर प्रवासाचे योग येतील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज प्रवासातील वातावरणाचा बदल नवीन उत्साह देऊन जाईल, नोकरी व्यवसायामध्ये हाताखालच्या लोकांचे सहकार्य मिळेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज ज्येष्ठांनी उपासनेत मन रमवल्यास शारीरिक आणि मानसिक दुखण्यापासून लांब राहतील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका, नाहीतर कामात अडथळे येतील, महिला घरातील कामात रमून जातील.
हेही वाचा:
Trigrahi Yog 2025:जून महिना 'या' 5 राशींसाठी भारी! 3 जबरदस्त ग्रहांचा 'त्रिग्रही योग' बनतोय, रातोरात श्रीमंतीचे संकेत, तुमची रास यात आहे का?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
