Horoscope Today 14 June 2024 : पंचांगानुसार, आज 14 जून 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी आज काळजी घ्यावी. कोणत्याही बाबतीत संयम राखणे आवश्यक.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आज पैशाची परिस्थिती मना जोगती सुधारेल त्यामुळे थोडे मनस्वास्थ्य मिळेल परंतु महिलांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करता येणार नाही.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
घरामध्ये तुम्ही मांडलेल्या मतांमधून काहीतरी चांगले निष्पन्न होईल आणि ते सर्वांच्या फायद्याचे असेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
ज्यांना परदेशी रमणाची इच्छा आहे त्यांनी आपली कागदपत्रे व्यवस्थित तयार करा. महिलांच्या हातून नावीन्यपूर्ण गोष्टी घडतील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
दैव देत आणि कर्म नेतं अशी काहीशी परिस्थिती आज होण्याची शक्यता आहे. योग्यता असली तरी संधी न मिळाल्यामुळे माघार घ्यावी लागेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
व्यवसायात विलंब आणि अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. राजकारणामध्ये असणाऱ्या व्यक्तींना योग्य संधी मिळतील.
तुळ रास (Libra Horoscope Today)
नोकरीत खूप काम केल्यानंतर वरिष्ठ तुमचा विचार करतील. जुन्या मतांच्या लोकांशी गाठ पडेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
आधुनिक विचारांचा मागोवा घ्याल. महिलांचा काटकसरीपणा इतरांच्या लक्षात येईल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आज घडणाऱ्या कोणत्याही घटनेला तुमच्यातील हळव्या भावनेची किनार राहणार आहे. आज थोडा हट्टीपणाही वाढेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
नोकरी व्यवसायात संघर्षाचा आणि प्रतिकाराचा भाग जास्त राहील. छोट्या छोट्या कारणावरून तापटपणा वाढेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आज इतरांपेक्षा स्वतःचा विचार जास्त कराल. घरामध्ये कोणाशी तुमची मते न पटल्यामुळे ताण तणाव वाढेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
तुमचा अस्थिर आणि चंचल स्वभाव आज जरा जास्तच उफाळून येईल परंतु अशाही परिस्थितीत तुमचा अभ्यास आणि चौकसपणा वाढेल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: