Horoscope Today 14 January 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 14जानेवारी 2026, आजचा वार बुधवार आहे. नुकतंच 2026 वर्ष सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज मकर संक्रांतचा सण अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज व्यवसायामध्ये एखादे काम मिळण्याच्या मागे असाल तर, उच्चपदस्थ लोकांच्या मध्यस्थीने कामे लवकर होतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज घरातील लोकांबाबत ज्याचं करावं भलं.. हा अनुभव येणार असल्यामुळे शांत राहणे श्रेयस्कर ठरेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज व्यवसायाची कामे अंतिम टप्प्यावरजाऊनपोहोचतील, पैसा मिळवण्यासाठी बरीच यातायात करावी लागेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज स्वतःचा स्वार्थ सांभाळताना इतरांवरअन्यायहोतनाहीना, याची काळजी घ्यावी लागेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज महिलांनी मनावर संयम ठेवावा, आज लोकांनाआपलेसेकरून टाकाल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीकांनो आज तुमच्या निर्मल हास्यमुळे सर्वांना मोहवूनटाकाल,परंतुत्याचबरोबर थोडा गर्विष्ठपणा सुद्धा राहणार आहे
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज शुल्लक गोष्टीवरून वाद-विवाद कराल, आवडत्या व्यक्तींच्यागाठीभेटी होतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज एखादी नवीन मोठी गुंतवणूक करण्याचा विचारकराल,घरातीलवयस्कर व्यक्तींच्या विचित्र वागण्याचा त्रास सहन करावा लागेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज थोडा मानसिक ताण राहिला तरी, येणारा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी नवीन आहे, त्यामुळे काम करण्यासाठी वेळ काढा
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनोआज तुमच्या स्वभावाला बांध घातला जाईल, महिला उत्साही वृत्तीने कामाला लागतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कधी कधीसत्वगुणाचा अतिरेक झाल्यामुळेइतरांचेफावतेहे लक्षात येईल, त्यासाठी सावध राहायला हवे
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज कलाकारांची कला बहरेल, खूपकष्टघ्यावेलागलेतरी प्रसिद्धीचे योग आहेत.
हेही वाचा
Makar Sankranti 2026: यंदाची मकर संक्रांत शनिच्या सर्वात लाडक्या 3 राशींसाठी भाग्यशाली! अचानक धनलाभ, मोठी संधी, कोणत्या राशी मालामाल होणार?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
