Horoscope Today 13 March 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 13 मार्च 2026, आजचा वार शुक्रवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस तुमच्यातील अवखळपणा आज जास्तच निदर्शनास येईल, कधीतरी अवघड परिस्थितीला ही तोंड द्यावे लागेल
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस तुमच्या वक्तृत्वावर लोक खुश होतील, ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे, त्यांना पैशाच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध होतील
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस भाग्याची साथ मिळाल्यामुळे खूप दिवसापासून अडलेली कामे मार्गी लागतील, प्रेम प्रकरणात यश मिळेल
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस महिलांना घरातून सहकार्य मिळेल, घरासंबंधी नवीन करार करायचे असतील त्यांनी पुढे जायला हरकत नाही
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस मागे जे पेरले असेल ते आज उगवणार आहे, ज्या क्षेत्रात काम करत असाल त्यामध्ये नवीन संशोधन कराल, त्यामुळे वरिष्ठ खूश होतील
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडल्यामुळे तुमची बरीचशी कामे मार्गी लागतील, वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या वर्चस्वाला तोंड द्यावे लागेल
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस कलाकारांना आपली कला सादर करताना जरा जास्त स्पष्ट वागावे लागेल, मनामध्ये नकारात्मक भावनाचे भवरे उमटतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस महिलांनी काही भरीव काम करण्याचा निश्चय करावा, घरामध्ये तुमच्या मताला किंमत येईल
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ लोकांची काळजी घ्यावी लागेल, पैसे मिळतील पण त्याचा संचय केला तर तो फायदेशीर ठरेल
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस जेवढी समाधानी वृत्ती ठेवाल तेवढे सुख मिळेल, जवळच्या मित्राशी थोडे मतभेद होऊ शकतात
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस घरातील वातावरण थोडे नरम गरम राहील, कुटुंबातील लोकांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस घरातील जुने हवे दावे डोके वर काढतील, विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या दृष्टीने शिक्षण घेण्यासाठी वेगळ्या वाटा शोधाव्या लागतील.
हेही वाचा>>
March 2026 Astrology: टेन्शन संपलं 3 राशींचं, 18 मार्चला 1..2 नाही, तब्बल 4 ग्रहांचं पॉवरफुल मिलन! पैसा, प्रगती डबल, श्रीमंतीचे योग बनतायत...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
