Horoscope Today 13 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 13 ऑगस्ट 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस हा सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज जोडीदाराचा कोणत्याही बाबतीतील थंड प्रतिसाद वादाला कारणीभूत ठरेल   

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज बौद्धिक दृष्ट्या तुम्ही हार मानणार नाही, नातेवाईकांकडून मात्र अपेक्षाभंगाचे दुःख जाणवेल   

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज महिला एखाद्या आवडत्या गोष्टीच्या आहारी जातील, व्यवसायात एखादी गोष्ट विलंबने झाली तरी बौद्धिक कसरती करून ती लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न कराल  

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून एखादी लाभदायक घटना अनुभवायला मिळेल, त्यामुळे उत्साह वाटेल     

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज जवळच्या नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील, परंतु त्यांच्याशी सुसंवाद साधताना थोडी विधा मनस्थिती होण्याची शक्यता आहे     

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो सर्व दिवस सारखे नसतात याची तुम्हाला कल्पना आहे. परंतु प्रयत्नांमध्ये कमतरता अजिबात नको हे मात्र नक्की.

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज मित्र मंडळींचे सहकार्य चांगले मिळेल, घरातील धार्मिक कार्यात भाग घ्याल प्रकृती स्थिर राहील     

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिलांना प्रसिद्धीचे योग येतील, आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम प्राणायाम ओंकाराची साथ धरलेली चांगली  

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज कोणत्याही परिस्थितीत आकाशाला गवसणी घालण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल.      

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज निराशेचे सावट दूर सारा, संधी दार ठोठावेल, फक्त आलेली संधी आहे हे ओळखायला हवं            

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज व्यवसायामध्ये काहीतरी नवीन करण्याची उमेद बाळगाल, आपली मोठ्यांबद्दलची कर्तव्य उत्कृष्ट निभवाल.       

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज कष्ट खूप होतील, परंतु त्यातूनही आज मार्ग काढावा लागेल. कोर्टकचेऱ्यांच्या केसेस रेंगाळतील.

हेही वाचा :           

Numerology: 'या' जन्मतारखा एकमेकांच्या शत्रू का असतात? बऱ्याचदा लग्न टिकत नाही, इतक्या शत्रुत्वाचे कारण काय? अंकशास्त्रात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)