Horoscope Today 13 April 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 13 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार रविवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीखंडेरायाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस महिलांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल होईल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज संततीच्या दृष्टीने दिवस मनासारखा जाईल मुलांबरोबर चर्चा करण्यासाठी उत्तम  काळ 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल, आत्मविश्वास वाढेल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज थोडे जास्त कष्ट केले, तर यश आपोआप मागे चालत येईल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यापारात भावनेच्या पातळीवर निर्णय घेतलेत, तर नुकसान पोहोचेल   

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज यशाचा मार्ग कष्टातूनच जातो हे लक्षात ठेवा, संबंधित लोकांची उत्तम संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा  

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज इतरांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा प्रश्न आपोआप सुटतील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज करमणुकीचे कार्यक्रम बघण्याचा मोह होईल, घरात वादाचे प्रसंग उद्भवले तरी समजूतीचे धोरण स्वीकारा 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज ज्यांना मणक्याचा हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी वेळीच उपचार घ्यावेत

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज महिलांना मनाप्रमाणे वागण्यास सुखद दिवस आहे, प्रसिद्धी मिळेल आणि पराक्रम वाढेल  

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज भरपूर आराम मिळावा असे वाटेल, प्रेम प्रकरणांमध्ये आपली बाजू मांडायला हरकत नाही  

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो उगीचच केलेल्या रडत राऊपणामुळे प्रगती खुंटण्याची शक्यता आहे

हेही वाचा..

Weekly Horoscope 14 To 20 April 2025: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी एप्रिलचा तिसरा आठवडा भारी! नव्या संधी मिळतील? साप्ताहिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)